Virat Kohli Record: आयपीएल २०२६ स्पर्धेतील साखळी फेरीतील ६१ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दमदार सुरुवात केली. यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० षटकांअखेर ४ गडी बाद २२२ धावा केल्या. यादरम्यान सलामीला आलेल्या गेल्या सामन्यातील शतकवीर विराट कोहलीने या डावात ५८ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीच्या बळावर विराट कोहलीने मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

विराट कोहलीने तिसऱ्यांदा केला असा कारनामा

विराट कोहलीने गेल्या सामन्यात दमदार शतकी खेळी केली होती. त्याआधी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये तो शून्यावर माघारी परतला होता. विराट या हंगामात दमदार फॉर्ममध्ये राहिला आहे. या हंगामात त्याने ५०० धावा पूर्ण केल्या आहेत. आतापर्यंत त्याने ९ वेळेस ५०० धावांचा पल्ला गाठला आहे. विराटने ३५ व्या वर्षांनंतर ३ वेळेस ५०० धावा पूर्ण केल्या आहेत. यासह ३५ वर्षांनंतर सर्वाधिक वेळेस ५०० हून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहोचला आहे. विराटने आतापर्यंत ३ वेळेस ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. याआधी हा रेकॉर्ड मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सचिन तेंडुलकर आणि फाफ डू प्लेसिसच्या नावे होता.

वयाची ३५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर विराटने २०२४ मध्ये ७४१ धावा केल्या होत्या. त्यानंतर विराटने २०२५ मध्ये ६५७ धावा केल्या होत्या. आता त्याने ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४ अर्धशतकं आणि २ शतकं झळकावली आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने उभारला २२२ धावांचा डोंगर

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. प्रथम फलंदाजी करताना जेकब बेथेल अवघ्या ११ धावांवर माघारी परतला. त्यानंतर विराट कोहलीने ५८ धावांची खेळी केली. तर देवदत्त पडिक्कलने ४५ आणि टीम डेव्हिडने २८ धावा केल्या. वेंकटेश अय्यर ७३ धावांवर नाबाद राहिला.