scorecardresearch

IND vs AUS 3rd ODI: सामना सुरु होताच विराट कोहलीने लुंगी डान्स गाण्यावर धरला ठेका, पाहा VIDEO

IND vs AUS 3rd ODI Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया तिसरा वनडे सामना चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिका आपल्या नावावर करेल

Virat Kohli danced to Lungi Dance song
विराट कोहली (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

India vs Australia 2023 3rd ODI Match Updates in Marathi: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी स्टार फलंदाज विराट कोहलीने मैदानावर आल्यावर लुंगी डान्स गाण्यावर नाचताना दिसला.

हा तिसरा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. कारण या अगोदर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाने प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळे तीन सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत आहे. म्हणून तिसरा वनडे सामना निर्णायक होणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी मैदानात उतरत होत, तेव्हा विराट कोहलीने सीमारेषेच्या आत येताच, लुंगी डान्स गाण्यावर ठेका धरला. ज्यामुळे इतर खेळाडू आणि प्रेक्षक त्याच्याकडे पाहू लागले. या अगोदर अनेकवेळा विराट कोहली मैदानावर डान्स करतान दिसला आहे.

दुसऱ्या सामन्यातही विराट कोहली नाटू-नाटू गाण्यावर थिरकताना दिसला होता. मात्र या सामन्यात भारताला १० विकेट्सने मोठा पराभव पत्कारावा लागला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने मालिकेत बरोबरी साधली. तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाताही बदल केलेला नाही. त्याचबरोबर ऑस्ट्रलियाने मात्र काही बदल केले आहे.

सामन्याबद्दल बोलायचे, आस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना मिचेल मार्श आणि ट्रेव्हिस हेडने डावाची सुरुवात केली आहे. आठ षटकानंतर आस्ट्रेलियाने बिनबाद ५२ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये मिचेल मार्श ३२ आणि ट्रेव्हिस हेड १९ धावांवर खेळत आहेत.

हेही वाचा – Virat Met Anushka: विराट कोहलीचा मोठा खुलासा; अनुष्का शर्मासोबतच्या पहिल्या भेटीची उघडली अनेक गुपितं

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ (कर्णधआर), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन अगर, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 14:14 IST

संबंधित बातम्या