भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीनं आज आपला एक आगळावेगळा अंदाज दाखवून दिला आहे. त्याने आज स्निकर हे बूट लाँच केले. हे बूट त्याने केवळ लाँच केले नाहीत तर या बुटचे डिझाईनही त्याने स्वत: केले आहे. याबाबतची माहिती विराटने स्वत: आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट करुन दिले आहे. १०० टक्के क्लासिक, १०० टक्के मी! असं विराटने या ट्विटमध्ये म्हटले आहे. मी आज बास्केट क्लासिक वन ८ लॉन्च करत आहे. क्रिकेटसाठी आणि इतर कोणत्याही ठिकाणी वापरण्यासाठी हे बूट अतिशय चांगले असल्याचे त्याने म्हटले आहे. मी याच्यावर ज्याप्रमाणे प्रेम करतो, त्याचप्रमाणे याबद्दल तुम्हाला काय वाटते तेही सांगा असं विराटने म्हटले आहे.
100% classic, 100% me! And it's finally here! I'm launching the Basket Classic one8 today.
‘रोज गाणी ऐकत ४५ मिनिटे घरातच चाला’ असे सांगणारा Cozy Cardio व्यायाम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या सर्वकाही
Period Pain : मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा; न्युट्रिशनिस्टनी सांगितल्या खास टिप्स….
नाशिकमध्ये पर्यावरणस्नेही विसर्जनासाठी तयारी, कृत्रिम तलावांची व्यवस्था, पीओपी मूर्ती नदीपात्रात विसर्जित केल्यास कारवाई
पाळीव कुत्र्याला फेरफटका मारण्यासाठी आख्खं स्टेडियम रिकामं करायला लावणं भोवलं; महिला IAS अधिकाऱ्याला निवृत्तीचे आदेश!
आता या बुटांची किंमत काय आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर विराटने डिझाईन केलेल्या या बुटांची किंमत ५,९९९ रुपये इतकी आहे. हे बूट दिसायलाही अतिशय ट्रेंडी असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. विराट कोहलीच नाही तर अभिनेत्री सोनम कपूरचा पतीही स्निकरचा फॅन आहे. आनंद आहुजानं २०१६ साली भारतात पहिला मल्टी ब्रांड स्निकर बुटीक लाँच केले होते. स्निकरबद्दलचं प्रेम आनंद आहुजा नेहमीच इन्स्टाग्रामवरून दाखवत असतो. एवढच नाही तर आनंद लग्नामध्येही सिल्व्हर रंगाचे स्निकर घालून आला होता. यामुळे त्याला ट्रोलही करण्यात आलं होतं. शाहरुख खान, करीना कपूर, जान्हवी कपूर हेदेखील यांनीही त्यांचं स्निकर प्रेम वारंवार दाखवलं आहे.