Viral Video: 'विराट' चाहत्याची स्वप्नपूर्ती, कोहलीला भेटण्यासाठी कायपण, कपिलची कहाणी ऐकून तुम्हीही व्हाल थक्क | Loksatta

Viral Video: ‘विराट’ चाहत्याची स्वप्नपूर्ती, कोहलीला भेटण्यासाठी कायपण, कपिलची कहाणी ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

विराट कोहलीला भेटण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतेच, पण….

Viral Video: ‘विराट’ चाहत्याची स्वप्नपूर्ती, कोहलीला भेटण्यासाठी कायपण, कपिलची कहाणी ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
विराट कोहलीच्या एका चाहत्यानं सोशल मीडियावर अप्रतिम व्हिडीओ शेअर केलाय. (image-social media)

मैदानात धावांचा पाऊस, चित्त्यासारख्या नुसत्या धावाच नाहीत, तर चौकार षटकारांची आतषबाजी आणि स्पायडर सारखी उडी घेत झेल टीपणारा रनमशीन म्हणजे भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली. क्रिकेटच्या मैदानात सचिन सचिन नावाचा गजर अजूनही वाजतोच, पण दुसरीकडे विराट विराट अशाही आवाजाने मैदान दणाणून निघतो. कारण मास्टर ब्लास्टर सचिनचे जगभरात कोट्यावधी चाहते आहेत. असाच चाहतावर्ग आता विराट कोहलीचाही झाला आहे. कारण नुकतंच विराटचा एक डाय हर्ट चाहता कपिलने विराटच्या भेटीचा एक जबरदस्त व्हिडीओ शेअर केला आहे.

विराटचा चाहता कपिलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. कपिल त्याच्या मित्रांसोबत बाईकवरू सवारी करत सकाळी ६ वाजताच्या सुमारास विराट कोहलीला भेटायला निघतो. कारण विराट नैनीतालच्या जवळ असलेल्या अल्मोडा रोडवर प्रसिद्ध खैंची धाम मंदिरात जाणार आहे, याबाबत कपिलला माहिती मिळाली होती. विराटला भेटण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतेच, पण विराटचा चाहता कपिलची कहाणी रंजक आहे. जेव्हा विराट त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबत सुट्ट्या एन्जॉय करायला नैनीताल मध्ये गेला होता, त्यावेळी विराटचा चाहता कपिलला त्यांना भेटण्याची संधी मिळते आणि जणू काही त्याची स्वप्नपूर्तीच होते.

आणखी वाचा – Miss Sri Lanka आफ्टर पार्टित तुंबळ हाणामारी, महिलांनी उपटल्या एकमेकिंच्या झिंज्या, Viral Video पाहणं मिस करु नका

व्हायरल व्हिडीओत काय आहे?

” आम्ही तिथे पोहोचलो. आम्हाला काहिच माहित नव्हतं. विराटच्या दौऱ्याबाबत आम्ही स्थानिक लोकांकडे विचारणा करत होतो. पण सर्वच आम्हाला वेगवेगळ्या कहाण्या ऐकवत होता. काहिंनी सांगितलं, विराट मंदिरात आहे. विराट सकाळी पाच वाजता आला, असं काहिंनी सांगितलं, त्यानंतर आम्ही १० वाजेपर्यंत प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला. अखेर खूप प्रतीक्षा केल्यानंतर आम्ही कोहलीली भेटलो आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेतली. येथील स्थानिक लोकांनी भारताच्या माजी कर्णधाराला एकप्रकारे घेरलंच होतं. त्यावेळी विराटने त्यांच्याशी संवादही साधला. कोहलीनं चाहत्यांना सांगितलं की, कारमध्ये बसलेल्या माझ्या मुलीचे फोटो आणि व्हिडीओ काढू नका. व्हिडीओत कॅप्शन मध्ये लिहिलंय, ” ज्या दिवशी मी विराट कोहली, अनुष्का शर्माला भेटलो, 17.11.22″

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर ३.१ मिलियनहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर ४.५ लाख लाईक्सही मिळाले आहेत. अशाप्रकारे विराटच्या चाहत्यानं त्याचा अनुभव शेअर केला आणि कमेंट मध्ये लिहिलं, मला अजूनही आठवतंय की, १३ मार्च २०२१ ला लखनौ विमानतळावर कोहलीला भेटलो होतो. मी सामना पाहण्यासाठी तिकिट खरेदी केलं होतं. पण कोरोनामुळं सामना रद्द करण्यात आला होता. मी त्यावेळी खूप निराश होतो. पण माझ्या वडिलांनी विमानतळावर असलेल्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर मला संपूर्ण भारतीय क्रिकेट संघाला मिळण्याची संधी मिळाली. तो दिवस मी कधीच विसरणार नाही.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 16:49 IST
Next Story
IND vs NZ: पराभवानंतर श्रेयस अय्यरने दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘थेट भारतातून येऊन इथे….!’