Virat Kohli Fears UFC Martial Arts: विराट कोहली हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. कारण त्याने आपला खेळ सातत्याने विकसित केला आहे. मैदानाबाहेरही तो चाहत्यांसाठी आपल्या मनमोहक हावभावांनी मने जिंकत असतो. तसेच कोहली वैयक्तिक आयुष्यात काय करतो, हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. सध्या विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेमुळे व्यस्त आहे. दरम्यान, विराटने ट्विटरवर एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने स्वतःबद्दल काही खुलासे केले आहेत.

या व्हिडिओमध्ये तो त्याच्या आवडत्या खाद्यपदार्थापासून सर्व गोष्टीबद्दस त्याच्या स्टाईलमध्ये बोलत आहे. पण सर्वात मनोरंजक खुलासा त्याने त्या गोष्टीबद्दल केला, जो खेळ खेळण्याचा प्रयत्न करताना त्याला भीती वाटते. आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जाणारा विराट कोहली म्हणतो की, तो UFC मिश्रित मार्शल आर्ट्स सारखे खेळ खेळण्याचा प्रयत्न करायला घाबरतो. त्याच क्लिपमध्ये, कोहलीने कबूल केले की गोल्फ हा एक खेळ आहे, जो शिकण्याचा प्रयत्न करूनही त्याला चांगल्या प्रकारे खेळता येत नाही.

Sanju Samson should be groomed as next T20 captain for India after Rohit says Harbhajan Singh
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Manoj Tiwary criticizes Glenn Maxwell
IPL 2024 : मॅक्सवेलच्या फ्लॉप शोवर माजी भारतीय खेळाडूची सडकून टीका; म्हणाला, ‘तो वेळोवेळी फक्त पगार घेतोय पण…’
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिल्ली कसोटीत कोहलीने दोन्ही डावात अनुक्रमे ४४ आणि २० धावा करत योगदान दिले. दिल्ली कसोटी जिंकून भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली असून सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी राखली आहे.

भारतीय संघ आता इंदूरला जाणार आहे. जिथे ते होळकर स्टेडियमवर तिसरी कसोटी खेळणार आहेत, परंतु त्याआधी खेळाडूंनी उर्वरित मालिकेसाठी त्यांची ऊर्जा वाचवण्यासाठी एक आठवड्यापेक्षा जास्त विश्रांती घेतली आहे.

हेही वाचा – MS Dhoni 15 Years in IPL:”१५ वर्षांपूर्वीची घटना आहे, जेव्हा थालाने…” धोनीने आयपीएलमध्ये पंधरा वर्षे पूर्ण केल्याने CSKचे भावनिक ट्विट

शेवटच्या दोन कसोटींसाठी टीम इंडिया –

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

हेही वाचा – PAK vs ENG: ‘जर मी असतो तर पाकिस्तानसाठी मरून राष्ट्रीय हिरो झालो असतो’; शोएब अख्तरने शाहीन आफ्रिदीला काढला चिमटा

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.