scorecardresearch

सोनू निगमच्या मुलाला विराट कोहलीकडून खास भेटवस्तू

विराटने निवानला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या

सोनू निगमच्या मुलाला विराट कोहलीकडून खास भेटवस्तू
विराटने निवानला आपली बॅट भेट म्हणून दिली तो क्षण

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम याचा मुलगा निवान सध्या भलताच आनंदात आहे. त्याच्या आनंदापाठीमागचं कारण ठरलाय तो भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली. विराट कोहलीने आपली हस्ताक्षर केलेली बॅट, निवानला भेट म्हणून दिली आहे. या दोघांमधील भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

आपल्या वडिलांकडून संगीताचा वारसा मिळालेल्या निवानला क्रिकेटमध्येही प्रचंड रस आहे. सध्या निवान माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. विराट कोहली हा निवानचा सर्वात आवडता क्रिकेटपटू आहे. त्याच्या आवडीबद्दल विराटला एक दिवस माहिती देण्यात आली, यानंतर विराटने निवानची भेट घेऊन आपली हस्ताक्षर केलेली बॅट त्याला भेट म्हणून देत त्याच्यासोबत फोटोही काढला.

https://www.instagram.com/p/Bjcu4sBhsYD/

आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर विराट कोहली काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार होता. मात्र दुखापतीमुळे यंदा विराट सरे क्लबकडून क्रिकेट खेळू शकणार नाहीये. आगामी काळात अफगाणिस्तान कसोटीनंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याआधी विराट तंदुरुस्त होऊन संघात परततो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-06-2018 at 14:11 IST

संबंधित बातम्या