बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात दुसरा कसोटी सामना गुरूवारपासून (२२ डिसेंबर) ढाका येथे खेळला जात आहे. मीरपूर कसोटीत टीम इंडिया संकटात सापडली आहे. दुसऱ्या कसोटीत टीम इंडिया एकवेळ मजबूत स्थितीत दिसत होती. कारण दुसऱ्या डावात बांगलादेशला २३१ धावांवर बाद केल्यानंतर १४५ धावांचे लक्ष्य सहज पार करेल असे वाटत होते. मात्र दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांची घसरगुंडी उडाली आहे. सध्या विजयासाठी १०० धावांची गरज असून ४५ धावांवर ४ बाद अशी अवस्था आहे. त्यात भर म्हणजे स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला.

ढाका येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहली कायम चर्चेत राहिला. कोहलीने बांगलादेशचा सलामीवीर नजमुल हसन शांतोला स्लेज केले ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा कोहली फलंदाजी करत असताना बांगलादेशचा गोलंदाज तैजुल इस्लामशी भिडला. आता त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sandeep Sharma may replace Shami
RR vs MI : टीम इंडियाच्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध संपला! ‘हा’ गोलंदाज घेऊ शकतो मोहम्मद शमीची जागा
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Shikhar Virat Meet Video
IPL 2024 : पंजाबविरुद्धच्या विजयानंतर विराटने नाराज शिखरला मारली मिठी, VIDEO होतोय व्हायरल
mumbai indians vs sunrisers hyderabad
IPL 2024 Match Preview : मुंबईचे पहिल्या विजयाचे लक्ष्य; सनरायजर्स हैदराबादविरुद्ध आज सामना; हार्दिकवर नजर

विराट कोहलीला राग का आला?

जेव्हा कोहलीने मेहंदी हसन मिराजविरुद्ध २२ चेंडूत एक धाव घेत आपली विकेट गमावली तेव्हा बांगलादेशी शिबिराने तो जल्लोषात साजरा केला. यादरम्यान तैजुल इस्लामने कोहलीला असे काही बोलले, ज्यावर तो चिडला आणि खेळाडूंकडे परत जाऊ लागला. मैदानावरील पंच तेथे पोहोचले आणि कोहलीला पुढे जाण्यापासून रोखले आणि त्याचवेळी बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसनही तेथे पोहोचला. कोहलीने शाकिबकडे तक्रार केल्यानंतर शाकिब मागे जाऊन तैजुलला काहीतरी समजावताना दिसला. कोहलीची प्रतिक्रिया पाहून एक गोष्ट स्पष्ट झाली की तो बांगलादेशी खेळाडूच्या वागण्यावर अजिबात खूश नाही.

टीम इंडियाला विजयासाठी १०० धावांची गरज

टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकण्यासाठी १०० धावांची गरज आहे, सध्या अक्षर पटेल आणि नाईट वॉचमन जयदेव उनाडकट खेळपट्टीवर आहेत, त्याआधी सलामीवीर कर्णधार केएल राहुल, शुबमन गिल मोठी खेळी खेळू शकले नाहीत, तर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीही माघारी परतले. स्वस्तात तंबूत, त्यामुळे टीम इंडियाची स्थिती थोडी कमकुवत झाली आहे. श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि रविचंद्रन अश्विन हे फलंदाजीत माहिर असले तरी टीम इंडियाला लक्ष्य गाठण्यात फारशी अडचण येऊ नये. मात्र इथून स्पर्धा अधिक कठीण होताना दिसत आहे.