Virat Kohli Viral Video: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑकलंडच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान भारतीय गोलंदाजांनी टीम इंडियाला चांगली सुरूवात करून दिली. यादरम्यान विराटने एका हाताने भन्नाट झेल घेतला. दरम्यान सीमा रेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना सामना पाहण्यासाठी आलेले चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसून आले. यादरम्यान विराटने दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली ५ नोव्हेंबरला आपला ३८ वा वाढदिवस साजरा करणार आहे. वाढदिवसाच्या एक दिवसाआधी तो भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मैदानात उतरला आहे. दरम्यान ज्यावेळी तो सीमा रेषेवर क्षेत्ररक्षण करत होता, त्यावेळी सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी एक सुरात ,”हॅप्पी बर्थडे विराट…” म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विराटनेही चाहत्यांना हात दाखवून थँक यू असं म्हटलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड

या सामन्यात धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. सलामीला आलेला रोहित शर्मा शून्यावर माघारी परतला. त्यानंतर शुबमन गिल आणि विराट कोहलीने मिळून भारताचा डाव सावरला. यादरम्यान विराटने १२ धावा करताच वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमाकांवर फलंदाजी करताना १३ हजार धावांचा पल्ला गाठला.यासह तो वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १३ हजार धावांचा पल्ला गाठणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला.

न्यूझीलंडचा पहिला डाव

या सामन्यात न्यूझीलंडचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. पण न्यूझीलंडचा एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. सलामीला आलेला टीम सेफर्ट ३८ धावांवर माघारी परतला.

Virat Kohli

तर विल यंग अवघ्या ९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर डॅरिल मिचेलने २८ आणि शेवटी ग्लेन फिलिप्सने ३० तर टिकनरने ३४ धावांचे योगदान दिले. पण न्यूझीलंडचा डाव १८५ धावांवर आटोपला.