scorecardresearch

IND vs AUS 4th Test: अहमदाबाद सामन्यात विराटचा नवा पराक्रम; सचिन-कपिल सारख्या दिग्गजांच्या ‘या’ यादीमध्ये झाला सामील

Border Gavaskar Trophy: भारतासाठी मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने कारकीर्दीत खेळल्या गेलेल्या २०० पैकी ९४ कसोटी मायदेशात खेळल्या आहेत.

IND vs AUS 4th Test Match Updates
विराट कोहली (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

IND vs AUS 4th Test Match Updates:भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील चौथा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जातोय. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत आहे. या सामन्यात मैदानात उतरताच विराट कोहलीने सचिन तेंडुलकर, कपिल देव, सौरव गंगुली आणि राहुल द्रविड यासारख्या अनेक दिग्गजांच्या यादीमध्ये स्थान मिळवले आहे.

वास्तविक, हा भारतीय खेळपट्टीवरील कोहलीचा ५० वा कसोटी सामना आहे. तो भारताचा १३ वा खेळाडू ठरला आहे. सध्याच्या संघात आर अश्विन आणि चेटेश्वर पुजारा यांनी त्याच्या आधी हा पराक्रम केला आहे. भारतासाठी मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, ज्याला क्रिकेटचा देव म्हणतात. मास्टर ब्लास्टरने आपल्या कारकीर्दीत खेळल्या गेलेल्या २०० पैकी ९४ कसोटी मायदेशात खेळल्या आहेत. त्याच वेळी, राहुल द्रविड, सुनील गावसकर, कपिल देव आणि अनिल कुंबळे या यादीतील पहिल्या ५ खेळाडूंमध्ये आहेत.

भारतासाठी मायदेशात सर्वाधिक कसोटी खेळणारे खेळाडू –

सचिन तेंडुलकर- ९४
राहुल द्रविड- ७०
सुनील गावस्कर- ६५
कपिल देव- ६५
अनिल कुंबळे- ६३
व्हीव्हीएस लक्ष्मण- ५७
आर अश्विन- ५५*
हरभजन सिंग- ५५
दिलीप वेंगसरकर- ५४
वीरेंद्र सेहवाग- ५२
चेतेश्वर पुजारा- ५१
सौरव गांगुली- ५०
विराट कोहली- ५०*

जर आपण विराट कोहलीच्या आकडेवारीकडे पाहिले, तर मायदेशातील कसोटी सामन्यांमध्ये त्याने ५८.२० च्या सरासरीने ३९५८ धावा केल्या आहेत. या दरम्यान, त्याने १०० धावांचा टप्पा १३ वेळा ओलांडला आहे. मायदेशाती विराट कोहलीची सर्वोत्कृष्ट धावसंख्या नाबाद २५४ आहे. विराट कोहलीकडून अहमदाबाद कसोटी सामन्यात भारतासाठी चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा – IND vs AUS: मोदींनी टॉस उडवलाचं नाही! ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली, दोन्ही संघांना शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी लावली हजेरी

ही कसोटी भारतासाठी खूप महत्वाची –

हा सामना भारतासाठी खूप महत्वाचा आहे. अहमदाबादमध्ये, कांगारूवर मात करुन टीम इंडिया मालिका ३-१ अशी जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात धडक मारण्याचा प्रयत्न करेल. असे झाले तर भारत दोनदा अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरेल. जर या सामन्यात भारत पराभूत झाला किंवा सामना अनिर्णात राहिला, तर टीम इंडियाला श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड मालिकेवर अवलंबून राहावे लागेल.

नाणेफेकीला नरेंद्र मोदींसह ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानी उपस्थित –

चौथ्या कसोटी सामन्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासह कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेकीला उपस्थिती लावली. त्यानंतर खेळाडूंशी भेटी-गाठी घेऊन चर्चा केली. दोन्ही देशांचे पंतप्रधान सजवलेल्या गोल्फ गाड्याच्या रथात बसून त्यांनी मैदानाचा फेरफटका मारला. सामन्याबद्दल बोलायचे तर, ऑस्ट्रेलियाने ४७ षटकानंतर २ बाद ११६ धावा केल्या आहेत. सध्या खेळपट्टीवर उस्मान ख्वाजा (४८) आणि स्टीव्ह स्मिथ (२२) खेळत आहेत. भारताकडून आश्विन आणि शमीने प्रत्येकी १ विकेट घेतली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2023 at 13:47 IST
ताज्या बातम्या