Virat Kohli poor batting average in 2024 : विराट कोहलीची गणना जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. गेल्या दशकात कोहलीने क्रिकेटमध्ये स्वत:चे एक खास स्थान निर्माण केले आहे. जोपर्यंत कोहली क्रीजवर आहे. तोपर्यंत टीम इंडिया हा सामना जिंकू शकेल, अशी आशा चाहत्यांना नेहमीच असते. मग तो मायदेशात खेळत असो किंवा परदेशात, त्याने प्रत्येक परिस्थितीत टीम इंडियासाठी धावा केल्या आहेत. त्याच्याकडे उत्कृष्ट तंत्र आणि फलंदाजीचे कौशल्य आहे. मात्र, २०२४ मध्ये तो नावाप्रमाणे कामगिरी करू शकलेला नाही आणि त्यांची सरासरी प्रचंड घसरली आहे.
विराट कोहलीने गेल्या ८ कसोटी डावांमध्ये केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. त्याच्यासारख्या मोठ्या खेळाडूकडून चाहत्यांना नेहमीच मोठ्या खेळीची अपेक्षा असते. त्याने २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ सामने खेळून एकूण ४८३ धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी २१.९५ आहे. कोहलीची त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत कोणत्याही वर्षात इतकी कमी सरासरी राहिलेली नाही. खराब फलंदाजीमुळेच तो या स्थानावर पोहोचला आहे. पण २०२४ हे वर्ष अजून संपलेले नाही आणि येत्या सामन्यांमध्ये जर त्याने चांगली कामगिरी केली तर त्याची सरासरी थोडी वाढण्याची शक्यता आहे.
विराट कोहलीने २०२४ मध्ये नोंदवली सर्वात खराब सरासरी –
याआधी २००८ मध्ये त्याची सर्वात खराब सरासरी राहिली होती. त्यानंतर त्याने एकूण ५ सामने खेळले होते आणि १५९ धावा केल्या होत्या. तेव्हा त्याची सरासरी ३१.८० होती. कोहलीने २००८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
विराट कोहलीच्या फलंदाजीची वार्षिक सरासरी:
- वर्ष २००८- ३१-८०
- वर्ष २००९- ५४.१६
- वर्ष २०१०- ४८.६१
- वर्ष २०११- ३९.१४
- वर्ष २०१२- ५३.३१
- वर्ष २०१३- ५३.१३
- वर्ष २०१४- ५५.७५
- वर्ष २०१५- ३८.४४
- वर्ष २०१६- ८६.५०
- वर्ष २०१७- ६८.७३
- वर्ष २०१८- ६८.३७
- वर्ष २०१९- ६४.६०
- वर्ष २०२०- ३६.६०
- वर्ष २०२१- ३७.०७
- वर्ष २०२२- ३८.५१
- वर्ष २०२३- ६६.०६
- वर्ष २०२४- २१.९५
तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० हून अधिक सामने खेळणारा विराट कोहली हा भारताचा एकमेव खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक शतके करणारा तो दुसरा खेळाडू आहे. त्याच्या नावावर ८० शतकांची नोंद आहे. त्याने विराट कोहलीने ११७ कसोटी सामन्यात ९०३५ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने २९५ वनडे सामन्यांमध्ये १३९०६ धावा आणि १२५ टी-२० सामन्यांमध्ये ४१८८ धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरच्या हिमालयासारखा विक्रम कोणता खेळाडू गाठू शकला असेल तर तो कोहली आहे.