Anushka Sharma Instagram Post for Virat Kohli Century: किंग कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वनडे मालिकेत सलग दुसरं शतक झळकावलं आहे. विराट कोहली वादळी फॉर्मात असून त्याने चौकार-षटकारांच्या मदतीने विक्रमी ८४वं आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं. एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात, पहिली विकेट लवकर पडल्यानंतर कोहली क्रीजवर आला आणि त्याने आक्रमक फटकेबाजी करत शतकी खेळी साकारली. विराटच्या शतकानंतर त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे.
विराट कोहलीने ९० चेंडूत त्याचं मालिकेतील सलग दुसरं शतक पूर्ण केलं आहे. विराट कोहलीचं हे वनडेमधील ५३वं शतक तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ८४वं शतक ठरलं आहे. विराट कोहलीने बाद होण्यापूर्वी ९३ चेंडूत ७ चौकार व २ षटकारांसह १०२ धावांची वादळी खेळी केली. यासह विराट व ऋतुराजने १५६ चेंडूत १९५ धावांची उत्कृष्ट भागीदारी साकारली.

अनुष्का शर्माची विराटच्या शतकासाठी केलेली खास पोस्ट पाहिलीत का?
विराट कोहलीने रांची वनडे सामन्यातही दणदणीत शतक झळकावलं होतं. विराटने १०१ चेंडूत चौकार खेचत शतक पूर्ण केलं, तर १३५ धावांची खेळी करत बाद झाला होता. विराटने शतक केल्यानंतर मैदानावर एकच जल्लोषाचं वातावरण होतं. शतक केल्यानंतर किंग कोहलीने हवेत उडी मारत आनंद साजरा केला. यानंतर त्याने गळ्यातील अंगठीला किस केलं आणि आभाळाकडे पाहत हात जोडले.
विराटच्या या शतकानंतर अवघ्या काही मिनिटांतच त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली. विराट दोन्ही हात वर करत शतकाचं सेलिब्रेशन करतानाचा फोटो पोस्ट केला आहे आणि त्यावर हार्ट इमोजी टाकला आहे.

विराट कोहली व अनुष्का शर्मा त्यांच्या कुटुंबांसह आता लंडनमध्ये स्थायिक झाले आहेत. विराट कोहली वनडे सामने खेळण्यासाठी संघाबरोबर असतो आणि त्यानंतर तो देखील कुटुंबासह लंडनमध्ये असतो. विराटच्या खास सामन्यांना अनुष्का अनेकदा उपस्थित असते.