भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. विराटचे लाखो चाहते आहेत. विराट हा २०२१ मधील सोशल मीडियावरील सगळ्यात जास्त कमाई करणारा भारतीय इन्फ्लुएन्सर आहे.
होपर एचक्यूने दिलेल्या वृत्तानुसार, विराट हा २०२१ मधला इन्स्टाग्रामवर सगळ्यात जास्त कमाई करणारा भारतीय इन्फ्लुएन्सर ठरला आहे. तर संपूर्ण जगात इन्स्टाग्रामवर सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या लोकांपैकी विराट एक आहे. या लिस्टमध्ये विराट १९ व्या क्रमांकावर आहे.
रिपोर्टनुसार, विराट त्याच्या इन्स्टाग्रामवरील एका पोस्टसाठी ५ कोटी रुपये मानधन घेतो. यामुळेच भारतातील इन्स्टाग्रामवरील सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या लोकांमध्ये २०२१ या वर्षी तो पहिल्या क्रमांकावर होता. दरम्यान, विराटने नुकतीच भारतीय क्रिकेट संघाच्या कसोटी कर्णधारपदावरून निवृत्ती जाहीर केली. यापूर्वी त्याने गेल्या वर्षी आयपीएल संघ आरसीबी आणि टी-२० क्रिकेटमधले भारतीय संघाचे कर्णधारपदही सोडले होते. टी-२० क्रिकेटचे कर्णधारपद सोडल्यानंतर बीसीसीआयने विराटकडून एकदिवसीय क्रिकेटचे कर्णधारपद काढून घेतले कारण बीसीसीआयला व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये दोन कर्णधार नको होते.