Virat Kohli Like Influencer Photo: क्रिकेटचा किंग विराट कोहलीचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे विराटचे सोशल मीडियावर आणि त्याच्या पोस्टवर, हालचालींवर चाहत्यांची बारीक नजर असते. गेल्या वर्षी, त्याच्या अकाऊंटवरून अभिनेत्री अवनीत कौरच्या एका ग्लॅमरस फोटोला लाईक केल्याची बातमी व्हायरल झाली होती. यावेळेस आता विराटने जर्मन इन्फ्लुएन्सरचा एक फोटो लाईक आहे, ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

विराटने काही महिन्यांपूर्वी अवनीत कौरचा फोटो लाईक केला होता. तेव्हा त्याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि चाहत्यांमध्ये मोठ्या चर्चेला सुरुवात झाली. त्यानंतर विराटने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आणि लिहिले की, त्याची फीड क्लिअर करताना अल्गोरिदममुळे ही चूक झाली. आता विराटने या इन्फ्लुएन्सरच्या फोटोवर लाईक केल्यानंतर पुन्हा अल्गोदिरमची चूक झाली का असा खोडकर प्रश्न चाहते विचारत आहेत.

विराट कोहलीने जर्मन इन्फ्लुएन्सर लिझलॅझच्या एका जुन्या इन्स्टाग्राम पोस्टला लाईक केलं आहे. चाहत्यांनी या पोस्टवर मीम्स आणि विनोदांचा वर्षाव केला आहे. लिझलॅझचे इन्स्टाग्राम हँडल lizlaz_tv आहे आणि ती विराट कोहलीची खूप मोठी चाहती आहे. एका मुलाखतीत तिने उघडपणे सांगितलं होतं की विराट तिचा आवडता क्रिकेटपटू आहे आणि ती स्वतःला त्याची एकनिष्ठ चाहती मानते. काही रील्समध्ये तिने आरसीबीची जर्सीसुद्धा घातलेली आहे. लिझलॅझने ३० जानेवारी रोजी एक फोटो पोस्ट केला होता, ज्याला विराटने लाईक केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, विराट तिला फॉलो करत नाही.

चाहत्यांनी लगेचच याचा संबंध गेल्या वर्षीच्या एका घटनेशी जोडला, जेव्हा विराटने चुकून अवनीत कौरच्या पोस्टला लाईक केलं होतं. आता चाहत्यांनी या घटनेवर सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिलं, “आता अल्गोरिदम दुसरा पॅराग्राफ लोड करत आहे.” काहींनी तर गंमतीने म्हटले, “विराट भाई अजूनही मुलींच्या फोटोंना लाईक करतोय. अनुष्काला सांगा.” तो लाइक हेतुपुरस्सर होता की अल्गोरिदममधील त्रुटी होती, हे अस्पष्ट आहे, परंतु या घटनेमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

Influencer Lizlaz post Virat kohli like

कोण आहे जर्मन इन्फ्लुएन्सर लिझलॅझ?

लिझलॅझ ही एक जर्मन सोशल मीडिया क्रिएटर, ट्रॅव्हल व्लॉगर, खवय्यी आणि गायिका आहे. तिचा दक्षिण आफ्रिकेशी खास कनेक्शन आहे. ती प्रामुख्याने प्रवास आणि संस्कृतीवर आधारित व्लॉग्स बनवते. तिने मानसशास्त्र विषयात एमएससी केलं आहे. तिला प्रवास करायला आणि विविध शहरे व देश फिरायला आवडतं, तसेच तिला त्या शहरांमधील खाद्यसंस्कृतीचाही आस्वाद घ्यायला आवडतोतिचे इनस्टाग्रामवर ४ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.