मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली यांची कायम तुलना केली जाते. सचिनने आपल्या २४ वर्षांच्या समृद्ध कारकिर्दीत अनेक विक्रम मोडले. आता विराटदेखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवून नवनवे विक्रम करत आहे. विराट कोहली हा सचिनपेक्षा धावांच्या आव्हानांचा पाठलाग करण्यात सरस आहे, असे मत काही दिवसांपूर्वी एबी डीव्हिलियर्स याने व्यक्त केले होते. त्यानंतर आता पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने सचिन आणि विराट यांच्यातील फरक सांगितला.

जेव्हा कपिल देव-दाऊद ड्रेसिंग रूममध्ये आमने-सामने येतात…

“विराट हा आधुनिक क्रिकेटमधील महान खेळाडू आहे. सचिनशी त्याची तुलना करणं बरोबर नाही कारण दोघांमध्ये खूप फरक आहे. स्वभावाने आणि फलंदाज म्हणून विराट खूप आक्रमक आहे. अर्थात ती आक्रमकता सकारात्मक आहे. सचिन शांत होता पण तरीही त्याचा खेळ आक्रमक होता. त्या दोघांच्या देहबोलीत फरक आहे. गोलंदाज म्हणून तुम्ही तो नीट पाहू शकता”, असे अक्रमने समालोचक आकाश चोप्राशी यु ट्यूब वर बोलताना सांगितलं.

“…त्यानंतर विराट परत माझ्या नादी लागला नाही”

“सचिनला जर मी डिवचण्याचा प्रयत्न केला असता, तर त्याने स्लेजिंगकडे लक्ष न देता खेळावर अधिक लक्ष केंद्रित केलं असतं. मला तरी सचिनबद्दल असं वाटतं. पण विराटला मात्र मी डिवचलं, तर तो मात्र चिडचिड करेल, रागावेल. जेव्हा फलंदाज रागात असतो, तेव्हा तो शक्य तितकी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळी फलंदाजाला बाद करण्याची सर्वात जास्त संधी असते”, असं अक्रम म्हणाला.

त्यांचे काही वेगळेच खेळ सुरू होते – हरभजन

मी दोघांची तुलना करू शकत नाही. विराट ठिकठिकाणी जाईल आणि नवेनवे विक्रम प्रस्थापित करेल. पण विराट सचिनचा विक्रम मोडू शकेल का? मला तरी शंका वाटते… कारण सचिनने खूप जास्त विक्रम करून ठेवले आहेत”, असे अक्रमने नमूद केले.