VIDEO : ‘त्या’ १० वर्षाच्या मुलाचा डान्स पाहून रेमो भारावलाच, सोबत विराटनंही ठोकला सलाम!

डान्स पाहून रेमोनं आपले शूज त्याच्यासमोर ठेवले अन्…

virat kohli mesmerised and tweeted after watching sanchit channas dance in super dance show
विराटकडून डान्सर संचितचं कौतुक

सोनी टीव्हीवरील डान्सिंग रिअॅलिटी शो सुपर डान्सर चॅप्टर ४ मध्ये गुरूंकडून कौतुकाची थाप मिळणे, ही मोठी गोष्ट आहे. परंतु १० वर्षीय संचित चन्नाने आपल्या एका डान्समुळे सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. कोरिओग्राफर फराह खान, गीता आणि रेमो डिसूझा यांनी संचितचे कौतुक केलेच, त्यासोबतच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीही संचितच्या डान्स पाहून भारावला. त्याने संचितसाठी एक ट्वीटही केले.

संचितने शाहरुख खान आणि मलायका अरोरा यांचे प्रसिद्ध गाणे छय्या-छय्या गाण्यावर डान्स केला. या गाण्याची कोरिओग्राफी फराह खानने केली होती. संचितचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर फराह म्हणाली, “मला वाटते की जर मी संचितला ट्रेनमध्ये बसवले तर तो त्याच पद्धतीने नाचेल. मला तुला टॉप ३ मध्ये पाहायचे आहे. तुझ्याकडे या शोमध्ये शेवटपर्यंत राहण्याची क्षमता आहे.” संचितच्या कामगिरीने फराह आणि रेमो पूर्णपणे भावनिक झाले.

हेही वाचा – ‘‘आता बाकीच्या देशांनी…”, द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक होणार हे कळताच वॉननं केलं ट्वीट!

रेमोनेही संचितला बेझुबान गाण्यावर त्याला डान्स करायला सांगितला. बेझुबान हे रेमोच्या एबीसीडी चित्रपटातील प्रसिद्ध गाणे आहे. संचितचा अप्रतिम डान्स पाहून रेमोने त्याचे शूज संचिसमोर ठेऊन त्याला नमस्कार केला. रेमो म्हणाला, ”या गाण्यात इतके बीट आहेत, हे मलाही ठाऊक नव्हते.” सुपर डान्सरच्या सुपर गुरुंनीही संचितला सलामी दिली.

विराटनेही संचितचा हा डान्स पाहिला. ”संचितची प्रतिभा पाहून मी मंत्रमुग्ध झालोय. तू अपवादात्मक आहे. तुला सलाम. देव तुला आशीर्वाद देवो. तुला डान्स करताना पाहून अंगावर काटा आला”, असे विराटने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Virat kohli mesmerised and tweeted after watching sanchit channas dance in super dance show adn

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना
ताज्या बातम्या