Virat Kohli on How RCB Comebackin Tournament: आरसीबीने १८ वर्षांच्या ट्रॉफीच्या प्रतिक्षेनंतर एकदा नव्हे तर सलद दोन वेळा आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. आरसीबीने गुजरातचा ५ विकेट्सने पराभ केला. विराट कोहलीने आरसीबीच्या या विजयात मोठी भूमिका बजावली. विराट कोहलीने या सामन्यात ४२ चेंडूत नाबाद ७५ धावांची खेळी केली. या सामन्यानंतर आरसीबीने स्पर्धेत चांगली सुरूवात केली आणि नंतर संघ मागे पडला होता, त्यानंतर संघाने कसं कमबॅक केलं हे विराटने सांगितलं आहे.
सलग दुसरं विजेतेपद जिंकल्यानंतर आणि यंदाचा हंगाम गेल्या वर्षापेक्षा कसा वेगळा वाटला याबद्दल विराट कोहली म्हणाला, “मी संघातील काही खेळाडूंना सांगितलं होतं की, गेल्या वर्षीसारखा दबाव यावेळी अजिबात जाणवत नाही. आमच्या संघात किती क्षमता आहे, याची आम्हाला पूर्ण जाणीव होती. आम्ही गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आणि त्यामागे ठोस कारण आहे.“
“आम्ही फक्त एकच गोष्ट ठरवली होती, क्रिकेट खेळायचं आणि आपल्या योजना अचूक राबवायच्या. तसं केलं तर आम्ही स्पर्धेतील सर्वोत्तम संघ राहू. लीग टप्प्यात आम्ही अव्वल स्थान मिळवलं, कारण आमच्याकडे आवश्यक कौशल्य, अनुभव, संयम आणि दबाव हाताळण्याची क्षमता आहे. आजच्या सामन्यातही खेळाडूंचा तो आत्मविश्वास आणि शांतता दिसून आली. हा खऱ्या अर्थाने एकतर्फी विजय होता.”
आरसीबीने स्पर्धेत सलग दोन सामने गमावल्यानंतर कसं कमबॅक केलं हे सांगितलं?
आरसीबीचा संघ स्पर्धेदरम्यान सातत्याने सामने गमावले होते, त्यावेळीस संघाने कमबॅक कसं केलं, हे विराटने सांगितलं, “ब्रेकनंतर आम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागला. एक पराभव झाला आणि मुंबई इंडियन्सविरुद्धचा विजयही खूप संघर्षपूर्ण होता. तो आठवडा आमच्यासाठी थोडा कठीण होता, कारण आम्हाला गुणतालिकेत अव्वल स्थान राखायचं होतं. पण मुंबईविरुद्धचा विजय मिळाल्यानंतर आमचा आत्मविश्वास पुन्हा वाढला. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सवर मोठा विजय मिळवला आणि मग आम्ही थेट अव्वल स्थानासह अंतिम फेरीकडे वाटचाल केली.”
संघाच्या एकूण कामगिरीबद्दल आणि प्रत्येक खेळाडूच्या योगदानाबद्दल विराट म्हणाला, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, संघात असे खेळाडू आहेत की ज्यांच्यासोबत खेळताना तुम्हाला असं वाटत नाही की संघासाठी प्रत्येक वेळी फक्त तुम्हालाच पुढे यावं लागेल. प्रत्येकजण जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार आहे आणि हीच आमच्या संघाची सर्वात मोठी ताकद आहे.”
