Virat Kohli Catch Video, IND vs NZ 1st ODI: भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली आपल्या फलंदाजीमुळे तर नेहमीच चर्चेत असतो. पण ज्यावेळी तो क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरतो,त्यावेळी त्याची फिटनेस आणि चपळता पाहून युवा खेळाडूंनाही हेवा वाटतो. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात त्याने डाईव्ह मारून एका हाताने अविश्वसनीय कॅच घेतला. हा कॅच घेतल्यानंतर केलेल्या भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कॅच घेतल्यानंतर विराटचं भन्नाट सेलिब्रेशन

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या वनडे मालिकेतील पहिला सामना ऑकलंडच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दमदार सुरूवात करून दिली. यादरम्यान क्षेत्ररक्षकांनीही गोलंदाजांना चांगली साथ दिली. २९ व्या षटकात अंशूल कंबोजच्या गोलंदाजीवर विराटने डाईव्ह मारून कॅच घेतला. तर झाले असे की, अंशूल कंबोज गोलंदाजी करत असताना नॅथन स्मिथ स्ट्राईकवर होता. त्यावेळी अंशूल कंबोजने आऊट स्विंगर चेंडू टाकला. स्मिथने या चेंडूवर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कडा घेऊन विराट कोहलीच्या हातात गेला. पण हा चेंडू खूप खाली होता. विराटने फुल स्ट्रेच केलं आणि डाईव्ह मारून एका हाताने कॅच घेतला. विराटने कॅच घेताच जोरदार सेलिब्रेशन केलं. पण अंपायरने निर्णय तिसऱ्या अंपायरकडे पाठवला आणि तिसऱ्या अंपायरने ग्रीन सिग्नन दिल्याने स्मिथला माघारी परतावं लागलं.

रोहित शर्माचा भन्नाट थ्रो

विराट कोहलीने कॅच घेण्याआधी रोहित शर्माने भन्नाट थ्रो करून डॅरिल मिचेलला बाद करत माघारी धाडलं होतं. २२ वे षटक टाकण्यासाठी अक्षर पटेल गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर ग्लेन फिलिप्सने पॅडवरचा चेंडू लेग साईडला ढकलून १ धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण करत असलेल्या रोहित शर्माने डाईव्ह मारली आणि चेंडू पकडून केएल राहुलकडे वेगान थ्रो दिला. केएल राहुलने जराही विलंब न करता यष्ट्या उधळल्या. त्यामुळे डॅरिल मिचेलचा डाव अवघ्या २८ धावांवर आटोपला.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन):
टिम सेफर्ट, विल यंग, हेन्री निकोल्स, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, काइल जेमिसन, जेकब डफी, ब्लेअर टिकनर

google trends

भारत (प्लेइंग इलेव्हन):

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टिरक्षक), नमन धीर, अंशुल कंबोज, आकिब नबी, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग</p>