Virat Kohli Ruled out of ODI Series: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकांना लवकरच सुरू होणार आहेत. पहिला कसोटी सामना ६ जून रोजी सुरू होईल. त्यानंतर १३ जूनपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होईल. बीसीसीआयने आयपीएल सुरू असतानाच या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच केली आहे. दरम्यान, अचानक एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा स्टार खेळाडू, विराट कोहली वनडे मालिकेतून बाहेर पडला असल्याचं समोर आलं आहे.
विराट कोहली बऱ्याच कालावधीनंतर टीम इंडियाकडून खेळण्याची तयारी करत होता. मात्र, कोहली आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आता विराट कोहली हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. काही दिवसांपूर्वी विराट कोहली आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळत होता. गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात कोहलीने नाबाद ७५ धावांची एक शानदार खेळी केली आणि षटकार मारून आपल्या संघाला सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्यास यशस्वीरित्या मदत केली.
आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यातील फायनलमध्ये फलंदाजी करत असताना विराट कोहलीला दुखापतीची त्रास जाणवत होता. सामन्यादरम्यान बऱ्याच वेळेस फिजिओ विराटच्या दुखापतीसाठी मैदानात आलेले पाहायला मिळालं. यानंतर आता विराट दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाल्याचे रिपोर्ट समोर येत आहेत.
आयपीएल २०२६ चं आरसीबीला जेतेपद पटकावून दिल्यानंतर विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासह वृंदावनला पोहोचला होता. वृंदावनमध्ये दोघांनीही प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेतलं. यादरम्यान विराट कोहली राधे राधे बोलतानाचा व्हीडिओदेखील समोर आला होता. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर विराट कोहलीचा एअरपोर्टवरील व्हीडिओदेखील समोर आला होता. त्याच्या टीशर्टने यादरम्यान सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
अफगाणिस्तानविरूद्ध वनडे मालिकेसाठी भारताचा संघ:
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली (दुखापत) श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार. हर्ष दुबे
भारत-अफगाणिस्तान वनडे मालिकेचं वेळापत्रक
पहिला वनडे सामना – १३ जून – धरमशाला
दुसरा वनडे सामना – १७ जून – धरमशाला
तिसरा वनडे सामना – २० जून – चेन्नई
