भारतीय खेळाडू ऋषभ पंतच्या कारला आज सकाळी त्यांच्या भीषण अपघात झाला. त्यामुळे त्याला दुखापतही झाली आहे. ऋषभ पंतने सांगितले की, तो योग्य वेळी कारमधून बाहेर पडला, ज्या क्षणी तो कारमधून बाहेर पडला, त्याच क्षणी त्याच्या कारला आग लागली. त्यानंतर ऋषभ पंतला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऋषभ पंत कार चालवत होता आणि तो एकटाच होता.

ऋषभ पंत आपल्या आईला सरप्राईज देण्यासाठी दिल्लीहून रुरकी येथील घरी जात असताना अपघात झाला. ऋषभ कार चालवत होता पण गाडी चालवताना त्याला झोप लागली, त्यामुळे हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच, स्टार फलंदाज विराट कोहलीने ट्विट करुन लवकर बरा होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
rahul gandhi in tamil nadu
राहुल गांधी आणि एम. के. स्टॅलिन एकत्र; तामिळनाडूमध्ये भाजपाला कसे रोखणार?
Nagpur Woman Harassed and Intimidated by accused to not give testimony Against him
नागपुरात महिलेने न्यायालयात साक्ष देऊ नये म्हणून विनयभंग.. आरोपीने अश्लिल…
World idli day 2024 how to make healthy oats idli
World idli day : पौष्टिक अन् झटपट नाश्त्यासाठी बनवा ‘ओट्स’ इडली; पाहा रेसिपी, प्रमाण

हेही वाचा – “मी क्रिकेट पाहत नाही, मी त्याला ओळखलं नाही! तो खिडकीतून अर्धवट…”; पंतचा जीव वाचवणाऱ्या बस चालकाने सांगितला घटनाक्रम

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सुट्टीवर आहे. त्याला ऋषभ पंतच्या अपघाताबद्दल समजताच त्याने लगेच ट्विट केले आहे. विराट कोहली ट्विटमध्ये लिहले, ‘ऋषभ पंत लवकर बरा हो. त्याचबरोबर त्याने देवाकडे ऋषभसाठी प्रार्थना केली आहे.’

विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतून ब्रेक घेतला आहे. तो नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर गेला आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी अनुष्का शर्मा देखील आहे. तसेच विराट कोहली श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेचा भाग आहे. त्यामुळे तो लवकरच पुनरागमन करणार आहे.

क्रीडा विश्वाने पंतच्या आरोग्यासाठी केली प्रार्थना –

ऋषभ पंतच्या या प्रकृतीनंतर उर्वशी रौतेलाशिवाय इतर खेळाडूंनीही त्याच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. खेळाडूच्या अपघाताचे वृत्त समजताच क्रीडा विश्वातील सर्व दिग्गज खेळाडूंनी ऋषभ पंतच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आणि त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे, मोहम्मद शमी या दिग्गजांनी ऋषभ पंतसाठी प्रार्थना केली.

हेही वाचा – Rishabh pant car accident : चेहऱ्याला जखमा, गुडघ्याला दुखापत, ऋषभ पंतची प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

ऋषभ पंतच्या डोक्यात दोन कट असल्याची माहिती बीसीसीआयने दिली. त्याच्या उजव्या गुडघ्यातील अस्थिबंधन फाटले असून उजव्या हाताच्या मनगटावर, घोट्याला, पायाच्या बोटाला दुखापत झाली आहे. तसेच, त्याच्या पाठीवर घर्षणाची जखम आहे. पंतची प्रकृती स्थिर असून त्याला आता डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. त्याच्या जखमा आणि पुढील उपचारांसाठी एमआरआय स्कॅन केले जाईल.

हेही वाचा – ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाल्यानंतर उर्वशी रौतेलाची पोस्ट, म्हणाली…

मॅक्स रुग्णालयात हलवले –

क्रिकेटपटू ऋषभ पंतला रुरकी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारानंतर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलचे डॉ. आशिष याज्ञिक यांनी सांगितले, पंत हा ऑर्थोपेडिक आणि प्लास्टिक सर्जनच्या देखरेखीखाली आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या तपासणीनंतर त्याचे तपशीलवार वैद्यकीय माहिती दिली जाईल.