Virat Kohli's Luxurious Alibaug Home Video: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने त्याच्या अलिबागमधील आलिशान नव्या घराचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. विराट कोहलीचा अलिबाग येथील बंगला पूर्णपणे तयार झाला आहे. कोहलीने पोस्ट शेअर करून त्याची झलक चाहत्यांना दाखवली आहे. या व्हीडिओमध्ये त्याचा हा बंगला सुरूवातीपासून कसा तयार करण्यात आला आणि तयार झाल्यानंतर हा आलिशान बंगला कसा दिसत आहे, हे विराटने स्वत: दाखवले आहे. हेही वाचा - कुलदीप यादव बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार? वर्ल्डकप विजयानंतर स्वतःच केला खुलासा; म्हणाला… विराटने शेअर केलेल्या या व्हीडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, अलिबागमध्ये आमचं घर बांधण्याचा हा प्रवास एक छान अनुभव होता आणि ते तयार होताना पाहून खूप आनंद होत आहे. आमच्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात आणल्याबद्दल संपूर्ण टीमचे खूप खूप आभार. माझ्या प्रियजनांसोबत इथे प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यासाठी मी उत्सुक आहे.” कोहलीच्या नवीन घराचा व्हिडिओ चाहत्यांनाही फार आवडला आहे. विराट कोहलीच्या अलिबागमधील बंगल्याची किंमत कोटींच्या घरात आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, बंगल्याची किंमत ही १३ कोटी रुपये आहे. कोहलीच्या या आलिशान बंगल्यात अनेक सोयीसुविधा आहेत. कोहलीचा हा आलिशान बंगला २००० स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. या बंगल्यात ४०० स्क्वेअर फूटचा स्विमिंग पूलही आहे. ज्याची एक झलक कोहलीने आपल्या पोस्टमध्ये दाखवली आहे. हेही वाचा - विराट कोहलीच्या मालकीचे रेस्टॉरंट One8 Commune विरोधात पोलिसांनी दाखल केला FIR, नेमकं काय घडलं? विराट कोहली या व्हिडिओमध्ये त्याच्या या नव्या घराबद्दल सांगताना दिसत आहे. तो म्हणाला, मी घर कसं उभं राहणार याचा सुरूवातीला प्लॅन ऐकला, जो खूपच अनोखा होता. एखाद्या हॉलिडे होममध्ये आवश्यक असलेल्या सर्व सुविधा इथे आहेत. या घरात एक स्पा देखील आहे, जो माझ्यासाठी एक यूएसपी आहे, असंही विराट म्हणाला. मला लिव्हिंग स्पेस आणि लिव्हिंग स्पेसमधून बाहेर जाण्यासाठी जी सोय आहे जी विराटला सर्वात जास्त आवडते. ही जागा सुंदर तर आहेच पण नैसर्गिक प्रकाशाच्या बाबतीत जसं विराटला अपेक्षित होतं अगदी तसंच काम बारकाईने केलेलं आहे. हे ठिकाण आराम करण्यासाठी आणि निर्धास्तपणे वेळ घालवण्याचं वातावरण निर्माण करणारी आहे, असं विराटने व्हीडिओच्या शेवटी सांगितलं.