Virat Kohli Statement After POTM Award: १९ वर्षे आरसीबीकडून खेळत संघाला सलग दुसरं जेतेपद पटकावून देण्यात मोठी भूमिका बजावली. विराट कोहलीने विजयी षटकार लगावत आरसीबीच्या विक्रमी विजयावर शिक्कामोर्तब केला. विराट कोहली हा १९ वर्षे एकाच संघाकडून खेळणारा एकमेव खेळाडू आहे. विराट कोहलीने आरसीबीकडून खेळताना गेली अनेक वर्षे एक मोठं स्वप्न पाहिलं होतं, जे अखेरीस यंदा पूर्ण झालं आहे. याची माहिती स्वत: विराट कोहलीने दिली.

गुजरातने दिलेल्या १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने दणक्यात सुरूवात केली. सलामीला आलेला विराट कोहली संघाला विजय मिळवून देत नाबाद माघारी परतला. विराट कोहलीने या सामन्यात ४२ चेंडूत ९ चौकार व ३ षटकारांसह ७५ धावांची खेळी केली. संघाला ५ धावांची गरज असताना विराटने १८व्या षटकात आधी चौकार लगावला आणि मग विजयी षटकार लगावत संघाला विजय मिळवून दिला.

सामनावीर पुरस्कारानंतर संघासाठी विजयी धावा केल्यानंतर कसं वाटलं यावर विराट म्हणाला, “खरंतर हा स्वप्नवत क्षण आहे. ज्याचं प्रत्येक क्रिकेटपटू स्वप्न पाहत असतो. मी या क्षणाचा अनेकदा विचार केला होता, की जेव्हा आरसीबी आयपीएलचं जेतेपद जिंकेल, तेव्हा मी तिथे मैदानात उभा राहून संघासाठी विजयी धावा करेन. आज ते शक्य झालं.”

आयपीएलच्या १९व्या हंगामात सर्वात वेगवान अर्धशतक झळकावल्याबद्दल विराट काय म्हणाला?

कोहली म्हणाला, खरं सांगायचं तर हे आधुनिक क्रिकेट आहे. आजचे तरुण खेळाडू सतत तुम्हाला आव्हान देत असतात. ते तुम्हाला तुमचा खेळ बदलण्यास आणि आणखी आक्रमक होण्यास भाग पाडतात. पण ही गोष्ट मला रोमांचक वाटते, कारण त्यामुळे स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी नवी प्रेरणा मिळते. मला माझा खेळ अधिक चांगला करण्याचा आणि नवीन गोष्टी शिकण्याचा नेहमीच अभिमान वाटतो. आजच्या क्रिकेटमध्ये अतिरिक्त २०-३० धावा किती महत्त्वाच्या आहेत, हे लक्षात घेऊन मला माझी मानसिकता बदलावी लागली. खेळ फारसा बदलला नाही, पण आक्रमक फटके अधिक वेळा खेळण्याचा आणि प्रतिस्पर्धी संघातील सर्वोत्तम गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

नक्कीच. आमचं पहिलं लक्ष्य गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवण्याचं होतं आणि आम्ही ते साध्य केलं. त्यानंतर अनेकांनी आम्हाला विचारलं की अंतिम फेरीत कोणत्या संघाविरुद्ध खेळायला आवडेल? पण आमच्यासाठी त्याला काहीच महत्त्व नव्हतं. समोर कोणत्या संघाची जर्सी आहे, याची आम्हाला पर्वा नव्हती. आम्ही उत्कृष्ट क्रिकेट खेळत होतो आणि आमचं पूर्ण लक्ष आरसीबी कसं खेळतेय यावर होतं, इतर संघांवर नाही. आम्ही सर्व प्रतिस्पर्धी संघांचा आदर करतो. कोणत्याही संघाला डिवचणं किंवा अनावश्यक वाद निर्माण करणं हा आमचा स्वभाव नाही. आम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळत राहण्यातच आनंद मानतो.

आमच्या संघात अनेक अनुभवी आणि परिपक्व खेळाडू आहेत. कठीण प्रसंगी अनुभवच सर्वात जास्त उपयोगी पडतो. कितीही आक्रमकता, उत्साह किंवा तडाखेबाज क्रिकेट असलं तरी मोठ्या सामन्यांमध्ये मोठ्या खेळाडूंनाच पुढे यावं लागतं. आणि आम्ही नेमकं तेच केलं,” असं अखेरीस विराट म्हणाला.

गुजरातने कदाचित मला लवकर बाद करण्याची योजना आखली असेल. पण मला पूर्ण विश्वास होता की मी बाद झालो तरी संघात इतकी खोली आहे की बाकीचे खेळाडू सामना जिंकून देतील.