scorecardresearch

Premium

IND vs PAK: किंग कोहलीने कोलंबोत ‘विराट’ शतक झळकावत मोडला एमएस धोनीचा विक्रम, राहुल द्रविडलाही टाकले मागे

India vs Pakistan Match Updates: विराट कोहलीने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर सलग चौथे एकदिवसीय शतक झळकावले. एकाच मैदानात सलग चार शतके झळकावून कोहलीने दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम अमलाची बरोबरी केली आहे.

Virat Kohli's 77th Century
विराट कोहली (फोटो-ट्विटर)

IND vs PAK Match Updates: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (१२२) याने सोमवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ४७ वे शतक झळकावले. त्याचबरोबर किंग कोहलीने अनेक विक्रम रचले. या कालावधीत विराट कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीत १३ हजार धावाही पूर्ण केल्या. या शतकी खेळीच्या जोरावर अनेक दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडले आहेत.

विराट कोहलीचे कोलंबोसोबतचे प्रेमसंबंधही कायम राहिले, जिथे तो पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात यशस्वी झाला. कोहलीने केवळ ९४ चेंडूत ९ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने १२२ धावा केल्या. आपल्या खेळीदरम्यान कोहलीने माजी कर्णधार एमएस धोनी आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचेही विक्रम मोडीत काढले.

IND vs ENG 4th Test Match Updates in marathi
IND vs ENG 4th Test : रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास! इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये झळकावले ‘अनोखे शतक’
IND vs ENG Akash Deep who made his Test debut brilliantly
IND vs ENG 3rd Test : आकाश दीपचे शानदार पदार्पण! एकाच षटकात इंग्लंडच्या दोन स्टार फलंदाजांना धाडले तंबूत
Kane Williamson 31st Test Century
SA vs NZ 1st Test : केन विल्यमसनने कसोटी क्रिकेटमध्ये झळकावले ३१वे शतक, फॅब फोरमध्ये कोहली-रुटला टाकले मागे
Sri Lanka vs Afghanistan Test Match Updates in marathi
SL vs AFG : क्रिकेटच्या मैदानात दिसले अनोखे दृश्य, पुतण्याने काकाला दिली पदार्पणाची कॅप; दोघांनी साकारली शतकी भागीदारी

रन मशीन कोहलीचा मोठा विक्रम –

विराट कोहलीने १२ व्यांदा एका वर्षात १००० किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्यात यश मिळवले आहे. विराट कोहली सर्वाधिक वर्षांमध्ये १००० किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. क्रिकेटमध्ये सर्वाधिक वर्षांमध्ये १००० किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने १६ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. मात्र, विराट कोहलीने या प्रकरणात एमएस धोनी आणि राहुल द्रविडला मागे टाकले. धोनी आणि द्रविड या दोघांनीही ११ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.

हेही वाचा – IND vs PAK: कोहलीचं शतक पाहून गौतम गंभीर काय म्हणाला? के. एल. राहुलचं कौतुक आणि विराटला…

सर्वाधिक वर्षांत १०००+ आंतरराष्ट्रीय धावा करणारे भारतीय फलंदाज –

१६ – सचिन तेंडुलकर
१२ – विराट कोहली
११ – एमएस धोनी
११ – राहुल द्रविड
९ – रोहित शर्मा<br>९ – सौरव गांगुली

पाकिस्तानविरुद्ध सचिननंतर विराट कोहलीची दहशत –

बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तानविरुद्ध १००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा विराट कोहली हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. या बाबतीतही महान फलंदाज सचिन तेंडुलकर आघाडीवर आहे. तेंडुलकरने बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तानविरुद्ध १३२२ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – IND vs PAK: विराट कोहलीने शतक झळकावत रचला इतिहास, वनडेत सर्वात जलद १३,००० धावा पूर्ण करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज

कोहलीचे कोलंबोवर खास प्रेम –

विराट कोहलीने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर सलग चौथे एकदिवसीय शतक झळकावले. एकाच मैदानात सलग चार शतके झळकावून कोहलीने दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम अमलाची बरोबरी केली आहे. आमलाने सेंच्युरियनमध्ये सलग चार एकदिवसीय शतके झळकावली आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Virat kohli surpassed ms dhoni and rahul dravid to score a century against pakistan in ind vs pak match vbm

First published on: 11-09-2023 at 20:26 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×