Premium

FA Cup Final 2023: मँचेस्टर सिटी आणि मँचेस्टर युनायटेडच्या सामन्याला भारतीय क्रिकेटपटूंनी लावली हजेरी, पाहा फोटो

FA Cup Final 2023: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना एफ कपची फायनल पाहण्यासाठी खास आमंत्रण देण्यात आलं होतं. या दोघांशिवाय हा सामना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आले होते. ज्यामध्ये सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिलचा समावेश होता.

Manchester City vs Manchester United FA Cup Final 2023
विराट कोहली आणि शुबमन गिल (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Manchester City vs Manchester United Final 2023: जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. या सामन्यासाठी टीम इंडिया खूप मेहनत घेत आहे. दरम्यान, संघातील खेळाडू फ्रेश होण्यासाठी फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी गेले. मँचेस्टर युनायटेड आणि मँचेस्टर सिटी यांच्यात एफए कपचा अंतिम सामना शनिवारी लंडनमध्ये खेळला गेला. भारतीय क्रिकेटपटूंसह अनेक भारतीय सेलिब्रिटींनी येथे हजेरी लावली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गिलने कोहलीसोबत एफए कप फायनल पाहिली –

भारताचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहलीला हा सामना पाहण्यासाठी खास निमंत्रण देण्यात आले होते. या सामन्यासाठी कोहलीसोबत त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मालाही आमंत्रित करण्यात आले होते. दोघेही अतिशय स्टायलिश स्टाईलमध्ये सामना पाहायला आले होते. त्यांच्यासोबत युवा फलंदाज शुबमन गिलही दिसला. गिल तपकिरी रंगाच्या हुडीमध्ये दिसला तर कोहलीने काळ्या टी-शर्टवर तपकिरी रंगाचे जाकीट घातलेले दिसले.

शुबमन गिल विराट कोहलीचा फेव्हरेट –

शुबमन गिल सध्या विराट कोहलीचा फेव्हरेट आहे. कोहलीने आयपीएल दरम्यान गिलसाठी अनेक वेळा इन्स्टाग्राम स्टोरी टाकली आणि त्याला भविष्यातील स्टार म्हटले. या दोघांना एकत्र पाहून गिल आता किंग कोहलीच्या अगदी जवळ आल्याचे स्पष्ट होते. या दोन खेळाडूंशिवाय सूर्यकुमार यादवही सामना पाहण्यासाठी आला होता मात्र तो कोहलीसोबत नव्हता. हा सामना पाहण्यासाठी युवराज सिंगही आला होता.

मँचेस्टर युनायटेडने एफए कप जिंकला –

मँचेस्टर सिटीने शनिवारी मँचेस्टर युनायटेडला हरवून सातवे एफए कप जेतेपद पटकावले. लंडनमधील वेम्बली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी मँचेस्टर युनायटेडचा २-१ ने पराभव केला. सिटीचा संघ २०१९ नंतर प्रथमच चॅम्पियन बनला आहे. त्याच्यासाठी कर्णधार एल्के गुंडोनने अंतिम सामन्यात दोन गोल केले. युनायटेडचा एकमेव गोल कर्णधार ब्रुनो फर्नांडिसने पेनल्टीवर केला.

हेही वाचा – ऋतुराज गायकवाड विवाहबद्ध! सायली संजीव नवविवाहित दांपत्याचा फोटो शेअर करत म्हणाली, “तुम्हा दोघांसाठी…”

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना इंग्लंडच्या ओव्हल येथे खेळला जाणार आहे. या सामन्याला ७ जूनपासून सुरुवात होणार आहे. या सामन्यात विराट कोहली, शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव हे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2023 at 10:29 IST
Next Story
ऋतुराज गायकवाड विवाहबद्ध! सायली संजीव नवविवाहित दांपत्याचा फोटो शेअर करत म्हणाली, “तुम्हा दोघांसाठी…”