Virat Kohli Angry reaction After his wicket video: आयपीएल २०२६ मधील अटीतटीच्या मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात विराट कोहलीने चांगली फलंदाजी केली. बाद होण्यापूर्वी किंग कोहलीने ३८ चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी केली. पण अर्धशतक करताच कोहली बाद होत माघारी परतला. पॅव्हेलियनकडे परत जाताना विराट खूपच संतप्त दिसत होता. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी त्याने आपले ग्लोव्हज आणि हेल्मेट फेकून दिले. त्याच्या या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावरील सामन्यात आरसीबीने १८ धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयानंतर आरसीबीचा संघ आता गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर मुंबईचा संघ आठव्या स्थानावर घसरला आहे. फिल सॉल्ट व विराट कोहली यांनी या सामन्यात १२० धावांची भागीदारी रचत संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. यादरम्यान दोन्ही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी साकारल्या.
विराट कोहली अर्धशतकानंतर बाद झाल्यानंतर संतापला अन् पाहा काय केलं?
कोहलीने या सामन्यात ३८ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि एका षटकारासह ५० धावा केल्या. त्याने ३७ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं, पण पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. हार्दिक पंड्याने त्याला झेलबाद करत माघारी धाडलं. कोहलीने हार्दिक पंड्याच्या फुलटॉसवर हवेत फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याला चेंडू वीट टाईम करता न आल्याने. सूर्याने सीमारेषेवर त्याचा झेलबाद केलं.
बाद झाल्यानंतर कोहली स्वतःवर खूप निराश दिसत होता. पॅव्हेलियनकडे परत जाताना त्याने रागाने आपले ग्लोव्हज फेकून दिले आणि नंतर आपलं हेल्मेट जमिनीवर आपटलं. कोहलीला आपल्या अर्धशतकानंतर मोठ्या खेळीची अपेक्षा होता, पण तो त्यात अपयशी ठरला, म्हणूनच विकेट गमावल्यानंतर तो स्वत:वर संतापला होता. त्याच्या प्रतिक्रियेनंतर आता पंच आणि सामनाधिकारी काय कारवाई करतात यावर सर्वांच्या नजरा असतील.
विराट कोहली मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षणासाठी दुसऱ्या डावात मैदानावर उतरू शकला नाही. फलंदाजी करताना त्याच्या घोट्याला थोडी दुखापत झाली होती त्यामुळेच तो दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण करताना दिसला नाही. ही दुखापत किती गंभीर आहे याची सर्वांना चिंता आहे. सामन्यानंतर कर्णधार रजत पाटीदार याला विराटच्या दुखापतीबद्दल विचारण्यात आलं, यावर रजतने माझ्यामते तो ठिक आहे, असं उत्तर दिले. त्यामुळे सर्वच जण निर्धास्त झाले. विराटबरोबर दुसरीकडे रोहित शर्माला देखील हॅमस्ट्रींगच्या दुखापतीचा त्रास झाला आहे. ज्यामुळे तो रिटायर्ड हर्ट होत मैदानाबाहेर गेला होता.
