Virat Kohli and Tim Southee Fighting Video Viral: भारत-न्यूझीलंड पुणे कसोटीत भारतीय संघ बॅकफूटवर आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर पहिल्या सत्रातच संघाने ६ विकेट्स गमावले आहेत. अशारितीने टीम इंडिया सर्वबाद होण्याच्या मार्गावर आहे. पण यादरम्यानच टीम साऊदी आणि विराट कोहली यांचा ड्रेसिंग रूमजवळील एक व्हीडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हे दोघे एकमेकांशी भांडताना दिसत होते.

पुणे कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २५९ धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने गोलंदाजीत सर्वाधिक ७ विकेट्स घेतले. यासह भारताने पहिल्याच दिवशी किवी संघाला सर्वबाद केले. यानंतर न्यूझीलंडचा डाव संपल्यानंतर संघ ड्रेसिंग रूममध्ये परतत असताना किवी संघाचे खेळाडू फिल्डिंगसाठी मैदानात उतरत होते. यादरम्यान विराट कोहली आणि टीम साऊदी एकमेकांना भेटले.

हेही वाचा – IND vs NZ: भारतीय फलंदाजांची पुन्हा उडाली दाणादाण, १५६ वर टीम इंडिया ऑल आऊट; सँटनरच्या फिरकीसमोर टेकले गुडघे

विराट कोहली ड्रेसिंग रुममध्ये परतत असताना वाटेत टीम साऊदी त्याला भेटला. यादरम्यान साऊदीने विराट कोहलीचा हात धरून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. विराट आणि साऊदी एकमेकांबरोबर मस्करी करत मारामारी करताना दिसले. यादरम्यान पंचही तिथे उभे होते. यांच्यातील या गंमतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराट कोहली आणि टीम साऊदीचा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विराट कोहली आणि टीम साऊदी यांनी २००८ च्या अंडर-१९ विश्वचषकात आपापल्या देशाकडून खेळताना क्रिकेट करिअरची सुरुवात केली होती. आज हे दोन्ही खेळाडू क्रिकेटच्या शिखरावर पोहोचले आहेत. हे दोन्ही खेळाडू मैदानावर एकमेकांविरुद्ध खेळत असले तरी मैदानाबाहेर ते चांगले मित्र आहेत.

हेही वाचा – IND vs NZ: मला काय माहित त्याला हिंदी समजते…”, पंत आणि वॉशिंग्टन सुंदरची योजना फसली; VIDEO मध्ये पाहा काय घडलं?

न्यूझीलंडविरुद्धच्या पुणे कसोटी सामन्यात विराट कोहलीची बॅट पुन्हा शांत राहिली. शुबमन गिल बाद झाल्यानंतर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. विराट कोहलीला ९ चेंडू खेळून केवळ १ धाव करता आली. सँटनरच्या चेंडूवर क्रॉस शॉट खेळण्याच्या प्रयत्नात विराट बोल्ड झाला. विराट बाद झाल्यानंतर त्यालाही स्वतवर विश्वास बसत नव्हता. तो बाद झाल्यानंतर त्यालाही विश्वास बसेना. विराट कोहली संघाला गरज असताना नकोश्या शॉटवर बाद झाल्याने ट्रोल होत आहे.

Story img Loader