scorecardresearch

VIDEO : राष्ट्रगीत सुरू असताना विराटनं केला ‘लाजिरवाणा’ प्रकार; नेटकऱ्यांनी म्हटलं, ”तू पाकिस्तानात जा!”

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Virat Kohli trolled for chewing gum during national anthem watch video
राष्ट्रगीत सुरू असताना विराट च्युइंगम चघळताना दिसला.

केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका (INDvsSA) यांच्यात तिसरी वनडे सामना रंगत आहे. पहिले दोन सामने जिंकल्यामुळे आफ्रिकेने मालिका खिशात टाकली आहे. त्यामुळे शेवट गोड करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला. परंतु सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी विराट कोहलीने केलेल्या एका कृतीमुळे तो जबरदस्त ट्रोल होऊ लागला. विराट सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो राष्ट्रगीतादरम्यान च्युइंगम चघळताना दिसत आहे. या व्हिडिओवरून विराटला ट्रोल केले जात आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, भारतीय संघाचे बाकीचे खेळाडू राष्ट्रगीत म्हणत आहेत, तर विराट च्युइंगम खाण्यात व्यस्त आहे. त्याच्या या कृतीला सोशल मीडियावर लाजिरवाणे म्हटले जात असून चाहते प्रचंड संताप व्यक्त करत आहेत.

हेही वाचा – टीम इंडियाचा टेस्ट कॅप्टन कोण असावा? शास्त्री म्हणाले, ‘‘जर रोहित फिट असेल…”

केपटाऊनच्या मैदानावर आज भारताचा कप्तान केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉकचे शतक आणि रूसी व्हॅन डर डुसेनच्या अर्धशतकाच्या जोरावर आफ्रिकेने भारताला २८८ धावांचे आव्हान दिले आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाची रणनीती पूर्णपणे अपयशी ठरली होती, पण या सामन्यातील शेवटच्या षटकात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे आफ्रिकेला तीनशेपार जाता आले नाही. प्रत्युत्तरात भारताकडून विराटने अर्धशतक ठोकले. संघाला आधाराची गरज असताना विराट केशव महाराजचा बळी ठरला. विराटने ५ चौकारांसह ६५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Virat kohli trolled for chewing gum during national anthem watch video adn

ताज्या बातम्या