Lizlaz Reaction on Virat Kohli Like on her post: टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली त्याच्या सोशल मीडियामुळे पुन्हा चर्चेत आला. आयपीएल २०२६ मध्ये खेळत असलेल्या विराटने आपल्या मैदानावरील कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधलं. पण त्याने इन्स्टाग्रामवर लाईक करत केलेल्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे. विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर जर्मन इन्फ्लुएन्सर लिझलॅझचा एक जुना फोटो लाईक केला. त्यामुळे कोहलीला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. यानंतर आता इन्फ्लुएन्सर लिझलॅझने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
विराट कोहलीच्या एका फोटो लाईक करण्याने सोशल मीडियावरील मोठी चर्चा रंगली. जर्मन-साऊथ आफ्रिकन इन्फ्लुएन्सरच्या पोस्टवरील साधा ‘लाईक’ क्षणार्धात व्हायरल झाला आणि त्यावरून मीम्स व जोक्सची लाट उसळली. चाहत्यांनी त्याच्या प्रसिद्ध “अल्गोरिदम” वक्तव्याचीही आठवण काढली.
लिझलॅझच्या जुन्या पोस्टवर कोहलीने लाईक केल्याने आणि तो तिचं अकाउंट फॉलो करत नसल्यामुळे हा विषय अधिक चर्चेत आला. स्क्रीनशॉट्स झपाट्याने व्हायरल झाले आणि हा छोटासा प्रकार ट्रेंडिंग टॉपिक बनला. सोशल मीडियावर याकडे टीकेपेक्षा विनोदाच्या दृष्टीने पाहिलं गेलं. नंतर हा लाईक व्हायरल झाल्यानंतर कोहलीने तो फोटो अनलाईकही केला. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना लिझलॅझने सांगितलं की, सुरुवातीला कोहलीने तिचा फोटो लाईक केल्यामुळे तिला आनंद झाला होता, पण नंतर त्याला तो अनलाईक करावा लागला याचं तिला वाईट वाटलं.
इन्फ्लुएन्सर लिझलॅझ विराट कोहलीबद्दल काय म्हणाली?
“नाही, खरं सांगायचं तर मला त्याच्याबद्दल थोडं वाईटच वाटलं. त्याने माझा फोटो लाईक केला यामुळे मी खूप आनंदी झाले होते, पण नंतर त्याने तो अनलाईक केल्यावर मला त्याच्यासाठी वाईट वाटलं. मला अजिबात समजलं नाही की हा इतका मोठा विषय कसा बनला. लोकांना हे कसं कळलं, आणि त्यातून बातमी कशी तयार झाली कदाचित त्याचा तसा हेतूही नसेल. तरीही मी त्याच्या सपोर्टसाठी आभारी आहे,” असं लिझलॅझ प्रतिक्रिया देताना म्हणाला.
“गेल्यावर्षी मी आयपीएलदरम्यान माझ्या बेंगळुरूच्या मित्रांसोबत सामने पाहायला सुरुवात केली. त्याचा प्रभाव माझ्यावरही पडला आणि मीही हळूहळू रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची चाहती बनत गेले आणि अर्थातच, RCB ला सपोर्ट करत असाल, तर विराट कोहली हा सर्वात कमाल खेळाडू आहे. तो खूपच उत्तम खेळतो. त्यामुळे त्याने माझा फोटो लाईक केला याचा मला आनंद झाला,” असं लिझलॅझने सांगितलं.
“माझ्यासाठी हे सगळं क्रेझी होतं, कारण मी सकाळी उठले आणि पाहिलं तर मी सगळीकडे बातम्यांमध्ये होते. त्याने नेमका कधी फोटो लाईक केला, हेही मला माहित नव्हतं, मला तर ते बातम्यांमधूनच समजलं. अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरील माझ्याबद्दलच्या बातम्या शोधून मला DM मध्ये पाठवल्या. आज मला खूप मेसेज आले होते,” असंही लिझलॅझने हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितलं.
