Virat Kohli Viral Video: हैदराबाद येथे झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सुरुवातीच्या लढतीत, भारत आणि इंग्लंड यांच्यात चुरशीची लढाई झाली, भारताच्या पराभवाने या सामन्यात अनेकांची निराशा झाली. पहिल्या डावातील दमदार कामगिरी करूनही, १९० धावांची आघाडी मिळवूनही, इंग्लंडच्या धडाडीच्या खेळीसमोर भारतीय खेळाडूंचे प्रयत्न निष्फळ ठरले. उपकर्णधार ऑली पोपची शानदार खेळी, फोक्स, अहमद आणि हार्टली यांच्यासह त्याच्या भागीदारीने इंग्लंडला विजय मिळवून दिला. पोपने, फक्त फलंदाजीच नव्हे तर हार्टलीच्या गोलंदाजीवर महत्त्वपूर्ण झेल घेत खरोखरच अष्टपैलू कामगिरी केली. इंग्लंडच्या फिरकीपटूंनी महत्त्वाच्या विकेट्स घेत दबाव कायम ठेवल्याने अंतिम सत्रात भारतीय संघाचा खेळ फसला. भरत आणि अश्विनने झुंज दिली असली तरी, हार्टलीच्या चेंडूने भारताच्या आशा मावळल्या व इंग्लंडचा विजय निश्चित झाला.

या पराभवानंतर सामन्याच्या महत्त्वाच्या क्षणांमध्ये बचावात्मक रणनीती आखल्याबद्दल चाहत्यांनी कर्णधार रोहित शर्मावर टीका केली. काहींनी त्याच्या दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, विशेषत: अधूनमधून, त्याने इंग्लंडच्या खेळाला हातभार लावला असेही काहींचे म्हणणे होते. एकीकडे रोहितचा दृष्टिकोन चर्चेत असताना दुसरीकडे विराट कोहलीचा एक जुना व्हिडीओ सुद्धा तुफान व्हायरल होत आहे. कोहलीच्या या व्हिडीओवरून अनेकांनी भारतीय संघ अतिआत्मविश्वासू झाल्याचे सुद्धा म्हटले आहे.

arvind kejriwal
अरविंद केजरीवालांचे वजन घटले नाही, तर १ किलो वाढले? भाजपा नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण!
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
Manmohan Singh journey from economic reform face to accidental PM analysis by Neerja Chowdhury
आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; निवृत्तीनंतर मनमोहन सिंगांना इतिहास न्याय देईल?
Does Achar Really Go Bad If Women In Periods Touch
मासिक पाळीत लोणच्याला हात लावला तर खरंच खराब होतं का? जया किशोरीचं स्पष्ट उत्तर, पाहा दोन्ही बाजू

हैदराबादमधील मालिकेच्या सलामीच्या सामन्यात भारताच्या पराभवानंतर, विराट कोहली त्वरीत सोशल मीडियावर एक ट्रेंडिंग विषय बनला. चाहत्यांनी माजी कर्णधाराची प्रभावी आकडेवारी आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाच्या मागील यशाची आठवण करून दिली आहे. कोहलीने या व्हिडिओमध्ये भारतीय संघ कसोटी सामन्यांमध्ये खेळताना कोणत्या मानसिकतेने खेळतो यावर भाष्य केले आहे. कोहली म्हणतो की, “मी हे उद्दामपणाने म्हणत नाही खरंच सांगतो की, आमचा स्वतःवर इतका विश्वास आहे की आम्ही कोणालाही, कुठेही हरवू शकतो.आपल्याला स्वतःलाच सिद्ध करावे लागेल विरोधी संघ दुबळा पडण्याची आपण वाट पाहू शकत नाही.”

विराट कोहली काय म्हणाला?

हैदराबाद कसोटीत भारताच्या पराभवानंतर, कर्णधार रोहितने म्हटले की, “फलंदाजांनी मिळालेल्या संधीचा फायदा घेतला नाही. टेस्ट क्रिकेट चार दिवसांत खेळले जाते, त्यामुळे कुठे चूक झाली हे शोधणे कठीण आहे. १९० धावांची आघाडी मिळाल्याने, आम्हाला वाटले की आम्ही खेळात खूप पुढे आहोत. भारतीय हवामान व खेळपट्टीवर पहिल्यांदाच मी एका परदेशी क्रिकेटरची अशी खेळी पाहिली आहे. ओली पोप खूपच कमाल खेळला. मला वाटलं की २३० हे साध्य करता येण्यासारखं लक्ष्य आहे पण आम्ही धावसंख्या गाठण्यासाठी साजेशी फलंदाजी केली नाही, गोलंदाजांनी खरोखरच आम्ही केलेल्या चर्चेतून वेगवेगळे बदल केले होते पण सरतेशेवटी पोपचे यश हे वाखाणण्याजोगे आहे. त्याचे खरोखर कौतुक कारण हा एक अटीतटीचा सामना झाला होता.”

हे ही वाचा<< ..म्हणून U-19 विश्वचषकात IND vs PAK होणार नाही! सुपर सिक्स टप्प्यात ‘हे’ सामने होणार ब्लॉकबस्टर

दरम्यान, विझाग येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत भारत आता नवे काय सुधार करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.