Virat Kohli Record In ODI: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑकलंडमध्ये सुरू आहे. या सामन्यात गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या १८५ धावांवर संपुष्ठात आणला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. रोहित शर्मा शून्यावर माघारी परतला.पण त्यानंतर विराट कोहली आणि शुबमन गिलने मिळून भारतीय संघाचा डाव सावरला. यादरम्यान विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

रोहित शर्मा शून्यावर बाद झाल्यानंतर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. या डावात फलंदाजी करताना १२ धावांचा पल्ला गाठताच त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १३ हजार धावांचा पल्ला गाठला आइहे. यासह वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १३ हजार धावांचा पल्ला गाठणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.

विराटे वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना २५४ सामन्यातील २५१ डावांत फलंदाजी करताना ६१ च्या सरासरीने १३ हजार धावा केल्या आहेत.यासह विराट कोहली हा रिकी पाँटिंगनंतर असा दुसराच फलंदाज आहे, ज्याने वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. हा या मालिकेतील पहिलाच सामना आहे. अजूनही ४ सामने शिल्लक आहेत. या ४ सामन्यांमध्ये विराट आणखी मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर करू शकतो.

वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

विराट कोहली (भारत)- १३००० धावा
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया)- १२६६२ धावा
कुमार संगकारा (श्रीलंका)- ९७४७ धावा
जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)- ७७७४ धावा
केन विलियम्सन ( न्यूझीलंड)- ६५०४ धावा

Virat Kohli

न्यूझीलंडने केल्या १८५ धावा

या सामन्यात न्यूझीलंडचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. पण न्यूझीलंडचा एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. सलामीला आलेला टीम सेफर्ट ३८ धावांवर माघारी परतला. तर विल यंग अवघ्या ९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर डॅरिल मिचेलने २८ आणि शेवटी ग्लेन फिलिप्सने ३० तर टिकनरने ३४ धावांचे योगदान दिले. पण न्यूझीलंडचा डाव १८५ धावांवर आटोपला.