Virat Kohli Hundred with World Record: विराट कोहलीने आपला वादळी फॉर्म काय ठेवत वर्ल्ड रेकॉर्ड करणार शतक झळकावलं. विराट कोहलीने शतक केलं असलं तरी भारताला तिसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवला आलेला नाही. भारताचे सर्व फलंदाज फेल झाल्याने विराटची एकाकी झुंज अपयशी ठरली. विराट कोहलीने मात्र शतक झळकावत मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

विराट कोहलीने फक्त ९१ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं, हे त्याचे ५४ वं एकदिवसीय शतक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ८५ वं शतक ठरलं. विराट कोहलीने न्यूझीलंडविरूद्ध पहिल्या सामन्यात विराट ९३ धावांवर बाद झाला आणि अवघ्या ७ धावांमुळे त्याचं शतक हुकलं. तर दुसऱ्या वनडेमध्ये विराट लवकर बाद झाला. पण तिसऱ्या सामन्यात विराटने शतकं पूर्ण केलं. विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांच्या बाबतीत अंतर फक्त १५ शतकांचं आहे. जर कोहलीने याच वेगाने शतकं करत राहिला तर सचिनचा विश्वविक्रम मोडला जाऊ शकतो. पण न्यूझीलंडविरूद्ध झळकावलेल्या शतकासह मात्र विराटने वीरेंद्र सेहवागचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे.

विराट कोहलीने न्यूझीलंडविरूद्ध वनडेमध्ये सातवं शतक झळकावलं आहे. यासह, तो न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज बनला, त्याने वीरेंद्र सेहवाग आणि रिकी पॉन्टिंग सारख्या दिग्गजांना मागे टाकलं. भारतामधील विराट कोहलीचं हे एकूण ४१ वं शतक आहे.

न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतकं झळकावणारे फलंदाज

विराट कोहली – ७ शतकं
वीरेंद्र सेहवाग – ६ शतकं
रिकी पॉन्टिंग – ६ शतकं
सचिन तेंडुलकर – ५ शतकं
महेला जयवर्धने – ५ शतकं

एवढंच नाही तर विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक शतकं करणारा फलंदाजही बनला आहे. त्याने जो रूट, जॅक कॅलिस आणि सचिन तेंडुलकर यांचे विक्रम मोडले. कोहलीने आता न्यूझीलंडविरुद्ध १० शतकं झळकावली आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक शतकं करणारे फलंदाज

१० – विराट कोहली (७३ डाव)*
९ – जो रूट (७१ डाव)
९ – जॅक कॅलिस (७६ डाव)
९ – सचिन तेंडुलकर (८० डाव)

विराट कोहलीचं कठीण प्रसंगात उत्कृष्ट शतक

तिसऱ्या वनडे सामन्यात एकेकाळी भारताच्या विकेट्स सतत पडत असल्याने कोहलीचं शतक अशक्य वाटत होतं. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर संघाचा स्कोअर फक्त २८ धावांवर असताना कोहली क्रीजवर आला. पण त्याच्या डोळ्यासमोर संघाने फक्त ७१ धावांत चार विकेट्स गमावल्या. पराभव अटळ वाटत होता, पण कोहलीला नितीश कुमार रेड्डीकडून चांगली साथ दिली आणि दोघांनी ८८ धावांची भागीदारी रचली. यादरम्यान कोहली-नितीश दोघांनीही अर्धशतकं झळकावली.

नितीश बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजाही झटपट बाद झाला आणि भारताची धावसंख्या ६ बाद १७८ अशी झाली. यादरम्यान हर्षित राणाने कोहलीला उत्कृष्ट साथ दिली. कोहलीने यासह अखेर ९१ चेंडूत त्याचं शतक पूर्ण केलं.