रनमशीन विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरूद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात बॅटने धुमाकूळ घातला आहे. किंग कोहलीने ७४ चेंडूत आपलं वादळी शतकी पूर्ण केलं. किंग कोहलीचं शतक म्हटल्यावर विक्रमांचा पाऊस पडणार याबाबत शंकाच नाही. विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा अजून एक मोठा विक्रम मोडीत काढला आहे. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजवर अशी कामगिरी जगाती कोणत्याच खेळाडूला जमली नव्हती.
विराट कोहलीने सुरूवातीला ७४ चेंडूत शानदार शतक झळकावलं. या शतकी खेळीदरम्यान विराट कोहलीने १५ हजार धावांचा टप्पा गाठला. याशिवाय भारतीय संघाला विजय मिळवून देत विराट कोहली नाबाद माघारी परतला. विराट कोहलीने या सामन्यात ८८ चेंडूत १० चौकार व ९ षटकारांसह १५७च्या स्ट्राईक रेटने नाबाद १३९ धावांची खेळी केली आहे. विराटच्या या खेळीच्या बळावर भारताने ४१.४ षटकांत ३०० धावा करत ८ विकेट्सने सामना जिंकला. यासह मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाच देशात सर्वाधिक धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. आधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे होता. आता मात्र किंग कोहली पुढे गेला आहे. सचिन तेंडुलकरने भारतात सर्वाधिक ६९७६ धावा केल्या होत्या. त्याच्यानंतर रिकी पॉन्टिंगचा नंबर आहे, ज्याने मायदेशात ऑस्ट्रेलियामध्ये ५५२१ धावा केल्या आहेत. या दोघांनाही मागे टाकत विराट कोहलीने आता एकाच देशात म्हणजेच भारतात ७००६ धावा केल्या आहेत.
एका देशात सर्वाधिक धावा वनडे क्रिकेट
७००६* – विराट कोहली (भारत)
६९७६ – सचिन तेंडुलकर (भारत)
५५२१ – रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया)
