Virat Kohli and Sri Lankan girl Video Viral: भारत आणि श्रीलंका संघांत बुधवारी आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोर फेरीतील चौथा सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेची ४१ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर या स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ४९.१ षटकांत सर्वबाद २१३ धावा केल्या होत्या. प्रत्युतरात श्रीलंकेचा संघ ४१.३ षटकांत १७२ धावांवर आटोपला. या सामन्यानंतर विराट कोहलीचा चाहत्यासोबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे जगभरात चाहते आहेत. न्यूझीलंड, श्रीलंका किंवा पाकिस्तान असो, कोहलीचे क्रिकेटप्रेमी चाहते प्रत्येक देशात आहेत. श्रीलंकेत असाच एक चाहता आहे, जो गेल्या १४ वर्षांपासून विराट कोहलीला भेटण्याची वाट पाहत होता, अखेर या चाहत्याची बुधवारी विराट कोहलीशी भेट झाली आणि प्रतिक्षा संपली.

विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका तरुणीसोबत दिसत आहे. श्रीलंकेतील ही तरुणी खासकरून विराट कोहलीला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये पोहोचली होती. विराट कोहलीनेही तिला निराश केले नाही आणि तो भेटण्यासाठी खाली आला.

हेही वाचा – सचिन तेंडुलकरने टाकली अशी गुगली की चाहते झाले बोल्ड, क्रिकेटच्या ‘या’ प्रश्नांची तुमच्याकडे आहेत का उत्तरं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराटने घेतली तरुणीची भेट –

पांढरा टॉप आणि जीन्स घातलेली ही तरुणी कोहलीला पाहून खूप खुश झाली. या तरुणीने विराट कोहलीचा हाताने बनवलेला फोटो भेट दिला. भारतीय फलंदाजाला हा फोटो खूप आवडला आणि त्याने तरुणीचे आभार मानले. व्हिडीओमध्ये तरुणीने कोहलीला सांगितले की, तिला २००९ पासून त्याला भेटण्याची इच्छा होती, आणि आता तिचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. कोहलीने तरुणीसोबत फोटोही काढले. यानंतर कोहलीने इतर अनेक चाहत्यांसोबत फोटो काढण्यासाठी पोझही दिली.