ओमानच्या मस्कत शहरात आजपासून लेजेंड्स लीग क्रिकेटला सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यात इंडिया महाराजास आणि आशिया लायन्स यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. मात्र या मोठ्या सामन्यापूर्वी भारताच्या संघाला मोठा झटका बसला आहे. इंडिया महाराजास संघाचा कर्णधार वीरेंद्र सेहवाग पहिल्या दोन सामन्यांना मुकणार आहे. संघाचा अनुभवी खेळाडू मोहम्मद कैफने ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आशिया लायन्सविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी मोहम्मद कैफने माध्यमांशी संवाद साधला. तो म्हणाला, ”वीरेंद्र सेहवागची काही वैयक्तिक कारणे आहेत, त्यामुळे तो पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. तो नंतर संघात सामील होईल, त्यामुळे पहिल्या दोन सामन्यांमध्ये मी भारतीय संघाचे नेतृत्व करेन.”

संघाची कमान हाती घेण्याबाबत मोहम्मद कैफ पुढे म्हणाला, ”मी देशांतर्गत स्तरासह अनेक सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. मी अनेक वर्षांपासून प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि समालोचक देखील आहे. हे सामने खूप मजेदार असणार आहेत, ज्यासाठी मी खूप उत्सुक आहे.” आज रात्री आठ वाजता इंडिया महाराजास आणि आशिया लायन्स सामना रंगणार आहे.

हेही वाचा – ICC Mens Test Team Of The Year 2021 : विराटला धक्का…! सर्वोत्तम कसोटी संघात रोहित शर्माचा समावेश

इंडिया महाराजास – हरभजन सिंग, युवराज सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण, एस बद्रीनाथ, आरपी सिंग, प्रग्यान ओझा, नमन ओझा, मनप्रीत गोनी, हेमांग बदानी, वेणुगोपाल राव, मुनाफ पटेल, संजय बांगर, नयन मोंगिया, अमित भंडारी.

आशिया लायन्स – शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी, सनथ जयसूर्या, मुथय्या मुरलीधरन, चामिंडा वास, मिसबाह-उल-हक, मोहम्मद हफीज, तिलकरत्ने दिलशान, उमर गुल, असगर अफगाण, उपुल थरंगा, कामरान अकमल, मोहम्मद युसूफ, नुवान कुलसेकरा, रोमेश कालुहार, मोहम्मद युसुफ.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virender sehwag will not play first two matches of legends cricket league adn
First published on: 20-01-2022 at 16:45 IST