कालच मिळाला पद्मश्रीचा सन्मान आणि आज केला ‘असा’ प्रकार; ऑलिम्पियन वीरेंद्र सिंग बसले फुटपाथवर!

ऑलिम्पियन वीरेंद्र सिंग हरियाणा भवनासमोर पद्मश्री, अर्जुन पुरस्कार आणि पदक घेऊन फुटपाथवर बसले आहेत. 

ऑलिम्पियन वीरेंद्र सिंग यांना काल पद्मश्री पुरस्कार मिळाला पण आज ते हरियाणा भवनासमोर पद्मश्री, अर्जुन पुरस्कार आणि पदक घेऊन फुटपाथवर बसले आहेत. हरियाणा सरकार आपल्याशी भेदभाव करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यावेळी पद्मश्री पुरस्काराची जोरदार चर्चा आहे. काल दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते मूकबधिर ऑलिम्पियन वीरेंद्र सिंग यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

वीरेंद्र यांना बोलता येत नाही आणि ऐकू येत नाही, पण त्यांच्या हातातील पदके आणि समोर द्रोण पुरस्कार हे त्यांच्या कुस्तीतील योगदानामुळेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची साक्ष आहे. त्यांची केंद्र सरकारशी कोणतीही तक्रार नाही पण हरियाणा सरकारबाबत त्यांच्याकडे तक्रारींची मोठी यादी आहे.

वीरेंद्रचा भाऊ रामवीरने सांगितले की, हरियाणा सरकारने फक्त एक कोटी आणि सी ग्रेड नोकरी दिली आहे, तर पॅरा ऑलिंपियन आणि ऑलिम्पियन्सना अधिक सुविधा दिल्या जात आहेत. आम्ही काल पंतप्रधानांनाही हे सांगितले आहे. ते म्हणाले आम्हा यावर चर्चा करु. 

पुरस्कार मिळाल्यानंतर वाद

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी कुस्तीपटू वीरेंद्र सिंगचे पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी ट्विटरवर लिहिले की, “राज्यातील सर्व लोकांसाठी ही अभिमानाची बाब आहे की हरियाणाचे सुपुत्र आणि फ्रीस्टाइल कुस्तीचे पॅरा पैलवान  वीरेंद्र सिंग  यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.”

ज्याला कुस्तीपटू वीरेंद्र सिंह यांनी उत्तर देताना कठोर शब्दात लिहिले, ‘मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मला पॅरा खेळाडू मानत असाल, तर पॅराला समान अधिकार का देत नाहीत, मी गेली चार वर्षे ठोकरे खात आहे, मी अजूनही ज्युनियर प्रशिक्षक आहे आणि समान रोख पुरस्कार देखील मिळाला नाही. काल मी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याशी बोललो, आता तुम्हीच निर्णय घ्या.”

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर बसले वीरेंद्र

पॅरा खेळाडूंना समान हक्क मिळावा यासाठी कुस्तीपटू वीरेंद्र सिंग मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर बसले. त्यांनी ट्विटरवर लिहिले, “माननीय मुख्यमंत्री  मनोहर लाल खट्टर जी, मी तुमच्या निवासस्थानी दिल्ली हरियाणा भवनच्या फूटपाथवर बसलो आहे आणि जोपर्यंत तुम्ही मुकबधीर खेळाडूंना पॅरा अ‍ॅथलीटसारखे अधिकार देत नाही तोपर्यंत मी येथून हलणार नाही, जर केंद्र आम्हाला समान अधिकार देत असेल तर तेव्हा तुम्ही का देत नाही?”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Virender singh protests outside haryana bhawan a day after receiving padma shri srk

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला