‘किती अन्यायकारक आहे हे…,’ कुस्तीपटू रवीकुमारचा फोटो शेअर करत सेहवागने व्यक्त केला संताप

विरेंद्र सेहवाग यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

ravi kumar dahiya, tokyo 2020 olympics, wrestler ravi kumar dahiya,
रवीकुमारचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ५७ किलो वजनी गटात भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहीया यानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लॅम सनयेव याचा पराभव केला आहे. रवीकुमारच्या विजयानंतर सगळे भारतीय रवीकुमारचे कौतुक करत होते तर काही त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करत होते. मात्र, यासगळ्यात चाहत्यांच्या एक गोष्ट लक्षात आली आहे. रवीतुमारच्या या  ऐतिहासिक विजयाच्या मार्गावर रवीकुमारला निर्दयीपणे कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लॅम सनयेव याने चावा घेतल्याचे दिसून आले. यावर आता अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या सामन्यातील व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर आता भारतीय क्रिकेट टीमचा दादा म्हणजेच विरेंद्र सेहवाग यांनीही यावर प्रतिक्रियी दिली आहे. विरेंद्र सेहवाग यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत रवीकुमारला कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लॅम सनयेव हा चावा घेत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे त्यानंतर रवीकुमारचा हात कसा दिसतो, ते दिसत आहे. हा फोटो शेअर करत, ‘हे किती अन्यायकारक आहे. कझाकिस्तानच्या नुरिस्लॅम सनयेवने रवि कुमार दहियाच्या हाताला चावा घेतला. पण, तरीही त्याच्या खिळाडूवृत्तीचा तो पराभव करू शकला नाही. नुरीस्लॅम सनयेव हे कृत्यं लाजीरवाण आहे. रवि खूप चांगला खेळलास, तू देशाचा सन्मान वाढवला’, असं विरेंद्र सेहवागने म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virender Sehwag (@virendersehwag)

आता रवीकुमारने अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर भारताचं यंदाच्या ऑलिम्पिकमधलं चौथं पदक निश्चित झालं आहे. सुरुवातीला ५-९ अशा पिछाडीवर पडलेल्या रवीकुमारनं तीन महत्त्वाचे गुण कमावले. त्यामुळे रवीकुमारचा अंतिम फेरीत प्रवेश झाला आहे. रवीकुमार हा दुसरा भारतीय आहे ज्याने ऑलिम्पिकच्या अंतिफ फेरीत प्रवेश केला आहे. या आधी सुशिल कुमार हा पहिला कुस्तीपटू होता ज्याने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता रवीकुमारचा अंतिम सामन्यात रशियाच्या झौर उगुएवशी सामना होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Virendra sehwag slam kazakhstan s nurislam sanayev for brutally biting ravi kumar dahiya during tokyo 2020 olympics dcp

Next Story
विजयी भव !