आयपीएलच्या हक्कांसाठी ‘VIVO’ने मोजले तब्बल…

VIVO स्मार्टफोन कंपनीकडे पुन्हा एकदा आयपीएलचं मुख्य प्रायोजकत्व

ipl
२१९९ कोटी खर्चून 'VIVO' ची 'OPPO' वर मात

चायनीज स्मार्टफोन कंपनी VIVO ने परत एकदा आयपीएलचं प्रायोजकत्व आपल्याकडे घेतलं आहे. आपल्याच देशातली प्रतिस्पर्धी OPPO ला मागे टाकत पुढील ५ वर्ष VIVO स्मार्ट फोन कंपनीने हे हक्क मिळवले आहेत. २०१६-२०१७ या दोन वर्षांतं कंत्रात संपल्यानंतर बीसीसीआयने मुख्य प्रायोजकांसाठी परत निवीदा मागवल्या होत्या. यावेळी VIVO ने आपल्या आधीच्या बोलीपेक्षा तब्बल ५५४% किंमत जास्त मोजून हक्क विकत घेतले आहेत. त्यामुळे २०१८ ते २०२२ पर्यंत आयपीएलचं प्रायोजकत्व VIVO कंपनीकडेच राहणार आहे.

OPPO कंपनीच्या १४३० कोटी रुपयांच्या बोलीला मागे टाकत VIVO स्मार्टफोन कंपनीने तब्बल २१९९ कोटी रुपये खर्च करुन परत बाजी मारली आहे. आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला आणि बीसीसीआयच्या अन्य अधिकाऱ्यांच्या समावेत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

VIVO कंपनीचा दोन वर्षांचा करार संपल्यानंतर बीसीसीआयने ३१ मे रोजी नवीन प्रायोजकत्वासाठीची प्रक्रिया सुरु केली. २१ जून ही आपल्या निवीदा भरण्याची अंतिम तारीख होती. याचसोबत आयपीएलच्या प्रसारणाचे हक्क असलेल्या सेट मॅक्स वाहिनीचा करारही आता संपलेला आहे. त्यामुळे नवीन प्रसारणासाठी १७ जुलैपासून बीसीसीआय निवीदा मागवणार आहे.

आयपीएलची यशस्वी १० वर्ष पुर्ण झाल्यानंतर पुढच्या वर्षापासून या स्पर्धेत काही बदल घडणार आहेत. खेळाडूंच्या लिलावापासून ते २ वर्षांची शिक्षा भोगत असलेले चेन्नई आणि राजस्थान हे संघही आयपीएलमध्ये परत एंट्री घेणार आहेत. त्यामुळे आयपीएलचं नवीन पर्व हे तितकंच रोमांचक होण्याची शक्यता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Vivo smart phone retain title sponsorship for ipl for next 5 years

ताज्या बातम्या