ना धोनी ना शिखर धवन…असा असेल टी-२० विश्वचषकासाठी भारताचा संघ

सैनी-शार्दुल ठाकूरलाही संघात स्थान नाही

२०२० वर्षात विराट कोहलीच्या भारतीय संघासमोर महत्वाचं आव्हान असेल ते ऑस्ट्रेलियात पार पडणाऱ्या टी-२० विश्वचषकाचं. वर्षाअखेरीस होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय संघाला सरावासाठी फार कमी सामने मिळतील, त्यामुळे संघाची बांधणी करणं हे विराट आणि रवी शास्त्रींसमोरचं मोठं आव्हान असेल. त्याआधीच सोशल मीडियावर अनेक माजी खेळाडू विश्वचषकासाठी आपल्या पसंतीप्रमाणे संघ जाहीर करत आहेत. भारताचा माजी कसोटीपटू व्ही.व्ही.एस.लक्ष्मणनेही आगामी टी-२० विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मणने या संघात महेंद्रसिंह धोनी आणि शिखर धवन या खेळाडूंना स्थान दिलेलं नाही. भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेदरम्यान Star Sports वाहिनीवरील एका कार्यक्रमात लक्ष्मण बोलत होता.

असा असेल लक्ष्मणचा टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मनिष पांडे, शिवम दुबे, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार

अवश्य वाचा – विराटचे सूचक संकेत, म्हणाला ‘या’ खेळाडूला मिळू शकतं टी-२० विश्वचषकाचं तिकीट

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vvs laxman leaves out ms dhoni shikhar dhawan in his india squad for world t20 psd

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या