काहीही हा..! वर्ल्डकप जिंकताच ऑस्ट्रेलियन खेळाडूंचं विचित्र सेलिब्रेशन; शूजमध्ये बिअर ओतली अन्…

मैदानावरील आक्रमक अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या कांगारूंनी विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर अगदी वेगळ्याच पद्धतीने विजय साजरा केला.

aus

आजपर्यंत आयसीसीच्या सर्व मानाच्या स्पर्धा जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या मनात एकही टी ट्वेंटी विश्वचषक न जिंकल्याची सल कायम होती. काल (रविवार) दुबईमध्ये ही सल देखील भरून काढत ऑस्ट्रेलियाने आपले पहिलेवहिले टी ट्वेंटी विश्वविजेतेपद पटकावले. मैदानावरील आक्रमक अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या कांगारूंनी विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर अगदी वेगळ्याच पद्धतीने विजय साजरा केला. त्यांच्या या अजब सेलिब्रेशनवर आता लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत.

अंतिम सामना जिंकल्यानंतर झालेल्या जंगी सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू चक्क बुटातून बिअर पिताना दिसून येत आहेत. वाचायला हे विचित्र वाटत असलं, तरी ते खरं आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात चमकलेला मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉइनिस या दोघांनी अशा प्रकारे आपला आनंद साजरा केला.

सुरुवातीला मॅथ्यूने आपला बूट काढला आणि त्यात बिअर ओतून प्यायला. त्यानंतर तोच बूट घेत मार्कसनेही मॅथ्युचेच अनुकरण केले. आयसीसीने शेअर केल्यानंतर या व्हिडिओला पहिल्या ११ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच यावर लोक मोठ्या प्रमाणात विविध प्रतिक्रिया देत आहेत.

दरम्यान, रविवारच्या सामन्यात न्यूझीलंडने दिलेले १७३ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने १८.५ षटकांत सहज गाठून पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-२० जेतेपदावर नाव कोरले. कर्णधार आरोन फिंच (५) पुन्हा अपयशी ठरल्यानंतर वॉर्नर आणि मार्श यांनी दुसऱ्या गडय़ासाठी ९२ धावांची वेगवान भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला होता. वॉर्नर माघारी परतल्यावरही मार्शने हंगामातील दुसरे अर्धशतक झळकावत ग्लेन मॅक्सवेलच्या (नाबाद २८) साथीने संघाला जेतेपद मिळवून दिले. मॅक्सवेलने लगावलेला विजयी फटका सीमारेषेपार जाण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मैदानात धाव घेतली.

हेही वाचा – ऑस्ट्रेलिया विश्वविजेते ; न्यूझीलंडवर अंतिम फेरीत आठ गडी राखून वर्चस्व

अशी नशिबाने थट्टा आज मांडली; वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पुन्हा पराभव

T20 WC Final: आधी कप्तानपद घेतलं काढून आणि नंतर बसवलं संघाबाहेर..! वॉर्नरनं ‘असा’ घेतला बदला

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Wade stoinis and australia team drinking beer in shoes video after winning t20 world cup hrc

Next Story
पाहा: वधू आणि तिच्या भावाचा संगीत सोहळ्यातील धम्माल परफॉर्मन्सBride and brother pull of epic wedding dance , संगीत सोहळा, video goes viral , bride and her brother perform a Bollywood medley at the Sangeet, Loksatta, Loksatta news, Marathi, marathi news
ताज्या बातम्या