वेल्सची स्वित्झर्लंडशी बरोबरी

डोक्याला दुखापत झाल्यानंतरही जिद्दीने खेळणाऱ्या कैफर मूरच्या निर्णायक गोलच्या बळावर वेल्सने युरो चषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी स्वित्झर्लंडला १-१ असे बरोबरीत रोखले.

एपी, बाकू (अझरबैजान) 

डोक्याला दुखापत झाल्यानंतरही जिद्दीने खेळणाऱ्या कैफर मूरच्या निर्णायक गोलच्या बळावर वेल्सने युरो चषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी स्वित्झर्लंडला १-१ असे बरोबरीत रोखले.

ब्रील एम्बोलोने ४९व्या मिनिटाला स्वित्झर्लंडसाठी पहिला गोल केला. मूरने मग ७४व्या मिनिटाला गोल नोंदवून वेल्सला बरोबरी साधून दिली. २०१६च्या युरोमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या वेल्सकडून यंदाही आश्चर्यकारक निकालाची अपेक्षा केली जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Wales equal to switzerland euro 2020 ssh

ताज्या बातम्या