बाळा, तुझ्या जन्माआधीपासून मी शतकं झळकावतोय, भर मैदानात आफ्रिदी आणि अफगाणी खेळाडूमध्ये जुंपली

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

श्रीलंकेत सुरु असलेल्या प्रमिअर लिग स्पर्धेत सध्या जगभरातले खेळाडू सहभागी झाले आहेत. सोमवारी कँडी विरुद्ध गॅले या संघामध्ये झालेल्या सामन्यात माजी पाकिस्तानी कर्णधार शाहीद आफ्रिदी आणि युवा अफगाणी खेळाडू नवीन उल-हकमध्ये जुंपलेली पहायला मिळाली. कँडीच्या संघाने गॅले संघावर मात करत स्पर्धेतला आपला पहिला विजय नोंदवला.

कँडी टस्कर्स संघाकडून खेळणारा अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन उल-हक आणि गॅले संघाचा मोहम्मद आमिर आणि शाहीद आफ्रिदी यांच्यात जुंपल्याचं पहायला मिळालं. नवीन टाकत असलेल्या १८ व्या षटकात मोहम्मद आमिरने चौकार लगावला. यानंतर शाहिद आफ्रिदीदेखील यात सहभागी झाला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शाहिद आफ्रिदीच्या चेहऱ्यावर नवीन उल-हक साठी असणारे भाव पाहण्यासारखे होते.

सामना संपल्यानंतर शाहिद आफ्रिदीने नवीन उल-हकला, बाळा तुझ्या जन्माआधीपासून मी शतकं झळकावतोय असं म्हणत त्याची बोलती बंद केली.

सोशल मीडियावर शाहिद आफ्रिदीच्या या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Was scoring 100s before you were born shahid afridi tells naveen ul haq amid fiery exchange in lpl psd