दक्षिण आफ्रिकेकडून बांगलादेशचा धुव्वा

‘अव्वल-१२’ फेरीच्या या सामन्यात बांगलादेशने दिलेले ८५ धावांचे माफक आव्हान आफ्रिकेने १३.३ षटकांत पूर्ण केले.

अबू धाबी : कॅगिसो रबाडा (३/२०) आणि आनरिख नॉर्किए (३/८) या वेगवान जोडीच्या भेदक माऱ्यामुळे दक्षिण आफ्रिकेने मंगळवारी ट्वेन्टी-२० विश्वचषकात बांगलादेशचा सहा गडी आणि ३९ चेंडू राखून धुव्वा उडवला. या विजयासह आफ्रिकेने उपांत्य फेरीसाठी दावेदारी अधिक भक्कम केली.

‘अव्वल-१२’ फेरीच्या या सामन्यात बांगलादेशने दिलेले ८५ धावांचे माफक आव्हान आफ्रिकेने १३.३ षटकांत पूर्ण केले. सलग चौथ्या पराभवामुळे बांगलादेशचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. कर्णधार तेम्बा बव्हूमा (नाबाद ३१) आणि ऱ्हासी वॅन डर डुसेन (२२) यांनी ४७ धावांची भागीदारी रचत तिसरा विजय सुनिश्चित केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Wash bangladesh from south africa akp

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला
ताज्या बातम्या