पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज वसीम अकरमने प्रशिक्षक पदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वसीम अकरमकडे क्रिकेटचा चांगला अनुभव असून १९९२ विश्वचषक विजेत्या संघात त्याची मोलाची भूमिका होती.त्याच्या नेतृत्वाखालील संघ १९९९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. तसेच टी २० लीगमध्ये त्याने एका संघाचं प्रशिक्षपदही भूषवलं आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये कोलकाता नाइट राइडर्सच्या सहयोगी स्टाफमध्ये होता. त्यानंतर पाकिस्तान सुपर लीगच्या फ्रेंचाइजीसोबत काम करत आहे. असं असूनही पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक बनण्यास त्याने नकार दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“जेव्हा आपण प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारतो, तेव्हा आपल्याला २०० ते २५० दिवस संघासोबत राहणं गरजेचं असतं. एक जबाबदारी असते. मला वाटत नाही, पाकिस्तानात माझ्या कुटुंबीयांपासून दूर राहत मी ही भूमिका बजावू शकतो. मी पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळाडूंसोबत वेळ घालवला आहे. त्या सगळ्यांकडे माझा नंबर असून ते माझ्याकडे गरजेवेळी सल्ला मागतात.” असं वसीम अक्रमने क्रिकेट कॉर्नरवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितंल. “मी मुर्ख नाही. मी सोशल मीडियावरील घडामोडींवर माझी नजर असते. लोकं आपल्या प्रशिक्षक आणि वरिष्ठांसोबत कसे वागतात, हे पाहिलं आहे. प्रशिक्षक खेळत नाही. खेळाडू खेळत असतात. प्रशिक्षक फक्त योजना तयार करण्यासाठी मदत करतो. जेव्हा संघ पराभूत होतो, तेव्हा मला वाटत नाही प्रशिक्षक यासाठी जबाबदार असतो.” असंही वसीम अकरमने पुढे सांगितलं. ‘या सर्व बाबींबद्दल मला भीती वाटते. मी अपमान सहन करू शकत नाही. माझं लोकांवर प्रेम आहे. मात्र सोशल मीडियावर होणारी बाबींबाबत चीड आहे. यामुळे आपण कोण आहोत हे कळतं. मी असं दुसऱ्या देशात कधीच पाहिलं नाही’, असं वसीम अकरम पुढे सांगितलं.

टी २० वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाचे ४ गोलंदाज जबरदस्त फॉर्मात; पण…

मिस्वाब-उल-हकने मागच्या महिन्यात वकार युनिससोबत पाकिस्तान संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. वकार संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. आता पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सकलेन मुश्ताक आणि अष्टपैलू अब्दुल रज्जाक आयसीसी टी २० विश्वचषकासाठी हंगामी प्रशिक्षक आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज मॅथ्यू हेडन संघासोबत असणार आहे.

आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण?; धोनीने दिलं उत्तर, म्हणाला…

वसीम अकरम क्रिकेट कारकिर्दीत १०४ कसोटी आणि ३५६ एकदिवसी या सामने खेळला आहे. कसोटीत त्याने ४१४ गडी बाद केले आहेत. तर एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर ५०२ गडी आहेत. वसीम अकरमने कसोटीत ३ शतकं आणि ७ अर्धशतकं झळकावली आहे. एकदिवसीय सामन्यात ६ अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wasim akram doesnt want to coach the pakistan cricket team rmt
First published on: 06-10-2021 at 16:26 IST