scorecardresearch

PSL 2023: कराची किंग्जच्या पराभवानंतर वसीम अक्रम चांगलाच संतापला रागाच्या भरात खुर्चीला मारली लाथ, पाहा VIDEO

Wasim Akram Video: पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2023 मध्ये कराची किंग्सचा आणखी एका सामन्यात थोडक्यात पराभव झाला. त्यानंतर वसीम अक्रम इतका संतप्त झाला की त्याने त्याच्या समोरच्या खुर्चीला लाथ मारली.

Wasim Akram kicks chair in anger
वसीम अक्रम (फोटो-ट्विटर)

पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) चे सामने जसजसे पुढे जात आहेत, तसतसा उत्साह वाढत चालला आहे. बुधवारी मुलतान सुलतान आणि कराची किंग्ज यांच्यात खेळला गेलेला सामना असाच होता, जिथे शेवटच्या षटकात श्वास रोखून धरायला लावणारे दृश्य पाहायला मिळाले. किंग्जचा कर्णधार इमाद वसीमच्या शानदार खेळीनंतरही दुसऱ्या टोकाकडून विकेट पडल्याने संघाला अवघ्या ३ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर किंग्जचा प्रमुख वसीम अक्रम संतापला.

संघाच्या पराभवामुळे वसीम अक्रम इतका संतप्त झाला होता की, त्याने रागात समोरच्या खुर्चीला लाथ मारली. अक्रमचा हा व्हिडिओ क्रिकेटच्या विश्वात चर्चेचा विषय ठरत आहे. मुलतान सुलतान्सविरुद्ध कराची किंग्जचा तीन धावांनी पराभव झाला. शेवटच्या दोन षटकांमध्ये कराची किंग्जला विजयासाठी ४० धावांची गरज होती, त्यानंतर मोहम्मद इलियासने १८ धावा दिल्या आणि शेवटच्या षटकात कराची किंग्जला २२ धावांची गरज होती.

अब्बास आफ्रिदीच्या सुरुवातीच्या दोन चेंडूंनी कराची किंग्जच्या खात्यात १५ धावांची भर पडली, म्हणजे शेवटच्या चार चेंडूंत फक्त सात धावा हव्या होत्या. यानंतर जे घडले ते कराची किंग्जच्या कोणत्याही चाहत्याला अपेक्षितच असेल. कराची किंग्जच्या या कामगिरीमुळे चाहत्यांचा मूड कसा असेल, याचा अंदाज तुम्ही वसीम अक्रमच्या या व्हिडिओवरून लावू शकता.

संपूर्ण सामन्यात काय घडले?

प्रथम फलंदाजी करताना मुलतान सुलतान्सने २० षटकांत २ गडी गमावून १९६ धावा केल्या. कर्णधार मोहम्मद रिझवानने ६४ चेंडूत ११० धावांची धडाकेबाज खेळी केली. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर जेम्स व्हिन्सने कराची किंग्जच्या वतीने २०० च्या स्ट्राईक रेटने धावा करत कहर केला, पण तो ३४ चेंडूत ७ चौकार, ६ षटकारांसह ७५ धावा करून धावबाद झाला.

हेही वाचा – INDW vs AUSW Semi-Final सामना पावसाने वाया गेला, तर अंतिम फेरीत कोणाला मिळणार प्रवेश? जाणून घ्या

यानंतर कर्णधार इमाद वसीमने आघाडी घेतली आणि २६ चेंडूत ५ षटकार मारत ४६ धावा करत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. शेवटच्या षटकात चांगली धावा केल्यानंतर दुसऱ्या टोकाला बेन कटिंग बाद झाल्याने इमादला स्ट्राईक मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांना सामना ३ धावांनी गमवावा लागला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-02-2023 at 15:49 IST

संबंधित बातम्या