scorecardresearch

Premium

ODI World Cup 2023: वनडे विश्वचषकासाठी वसीम जाफरने निवडला आपला १५ सदस्यीय संघ, ‘या’ खेळाडूंना दिली पसंती

Wasim Jaffer picks 15 member squad: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफरने आपला १५ सदस्यीय संघ निवडला आहे.

Wasim Jaffer's squad for ODI World Cup 2023
वसीम जाफर (फोटो-संग्रहित छायाचित्र लोकसत्ता)

Wasim Jaffer’s squad for ODI World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धा यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा यंदा भारतात होणार आहे. क्रिकेटच्या या महाकुंभाचे वेळापत्रकही आयसीसीने जाहीर केले आहे. भारतातील १० शहरांमध्ये एकूण ४८ विश्वचषक सामने खेळवले जाणार आहेत. आतापर्यंत भारतीय क्रिकेट बोर्डाने विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड केलेली नाही. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने आपला पंधरा १५ सदस्यीय संघ निवडला आहे.

जिओ सिनेमावरील चर्चेदरम्यान, वसीम जाफरने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपला आवडता १५ सदस्यीय संघ निवडला. यामध्ये त्याने तीन सलामीवीरांना स्थान दिले. यात रोहित शर्मा, शिखर धवन आणि शुबमन गिल यांना निवडले आहे. तो म्हणाला, “माझ्याकडे तीन सलामीवीर असतील. शिखर धवनची निवड होणार नसली तरी, मी त्याला माझ्या संघात बॅकअप सलामीवीर म्हणून ठेवेन.”

Asian Games 2023 Updates
Asian Games: भारतीय पुरुष क्रिकेट संघाने पटकावले सुवर्णपदक, अफगाणिस्तानला खराब रॅकिंगचा बसला फटका
Asian Gmaes 2023 IND vs AFG T20 Final Highlights
IND vs AFG T20 Final Highlights: हांगझोऊमध्ये पावसामुळे फायनल सामना झाला रद्द, भारतीय पुरुष क्रिकेट संघाने सुवर्णपदकावर कोरले नाव
Yuvraj Singh revealed 2011 World Cup
World Cup 2011: ‘वृत्तपत्र वाचणे, टीव्ही पाहणे बंद करा’; ‘या’ खेळाडूच्या सल्ल्यामुळे भारताने जिंकला विश्वचषक, युवराज सिंगचा खुलासा
World Cup 2023: Sri Lankan team announced for the World Cup Dasun Shanaka will be the captain these players got place
Sri Lanka World Cup Squad: विश्वचषक २०२३साठी श्रीलंका संघ जाहीर! जखमी खेळाडूंना स्थान दिले, मेंडिसला बनवले उपकर्णधार

मधल्या फळी आणि फिरकीपटूबद्दल तो पुढे म्हणाला, “विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळेल यात शंका नाही. श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर, केएल राहुल पाचव्या क्रमांकावर आणि हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर खेळेल. यानंतर माझे तीन फिरकीपटू रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव असतील.”

हेही वाचा – Shikhar Dhawan : ‘ना रेडी’ गाण्यावर शिखर धवनने धरला ठेका, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

माजी भारतीय सलामीवीर म्हणाला, “माझ्या विश्वचषक इलेव्हनमध्ये जसप्रीत बुमराह असेल. त्याचबरोबर शमी आणि सिराजमधील एक असेल. मी सिराज आणि बुमराह या दोन वेगवान गोलंदाजांची निवड करेन. माझ्यासाठी हार्दिक पांड्याने गोलंदाजी करणे महत्त्वाचे आहे. कारण विश्वचषक भारतात आहे आणि माझ्या इलेव्हनमध्ये तीन फिरकीपटू असतील.”

एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या स्पर्धेसाठी वसीम जाफरचा भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन (राखीव यष्टिरक्षक) आणि शार्दुल ठाकूर.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wasim jaffer named the 15man squad for team india for odi world cup 2023 vbm

First published on: 24-07-2023 at 17:31 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×