वसीम जाफरनं काढली अंपायर कुमार धर्मसेना यांची कळ; फोटो पोस्ट करत म्हणाला, “अरे कुमार…”

आज टी-२० वर्ल्डकपमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात इंग्लंड-न्यूझीलंड भिडणार आहेत. या सामन्यापूर्वी…

Wasim jaffer trolled umpire kumar dharmasena before england new zealand semifinal clash
वसीम जाफर

माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी तो कधी ना कधी मजेदार ट्वीट करतो. टी-२० विश्वचषक-२०२१ मध्ये आज होणाऱ्या सेमीफायनल सामन्यापूर्वी त्याने असेच एक ट्वीट केले होते. त्याने पंच कुमार धर्मसेना यांना ट्रोल केले. टी-२० विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.

इंग्लंड-न्यूझीलंडच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी वसीम जाफरने पंच कुमार धर्मसेना यांना ट्रोल केले. २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकात हे दोन संघ आमनेसामने आले, तेव्हा धर्मसेना सामना अधिकाऱ्यांपैकी एक होते. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला इंग्लंडविरुद्ध नाट्यमय पराभवाला सामोरे जावे लागले.

हेही वाचा – अरेरे..! नेतृत्व सोडलं, वर्ल्डकपही गेला आणि आता…; विराट कोहलीला अजून एक धक्का!

कुमार धर्मसेनाचा फोटो पोस्ट करत जाफरने प्रश्नार्थक पद्धतीने लिहिले, ‘अरे कुमार, आज किती वाजता सामना सुरू होईल?’ या फोटोत धर्मसेना सहा बोटे दर्शवत आहेत. एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड आमनेसामने होते, तेव्हाचा हा फोटो आहे. धर्मसेना यांनी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला चार धावा दिल्या होत्या. यानंतरच सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि न्यूझीलंडला पराभवाला सामोरे जावे लागले.

काय घडले होते त्या सामन्यात?

इंग्लंड आणि न्यूझीलंडने समान षटकात २४१ धावा केल्या होत्या. सुपर ओव्हरमध्ये त्यांनी प्रत्येकी १५ धावा केल्या. पण चौकारांच्या आधारावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. ८४ धावांची नाबाद खेळी करणाऱ्या स्टोक्सला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. आता या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीकडेही त्याच सामन्याचा रिप्ले म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान, इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीसाठी पात्र होण्यापूर्वी ५ पैकी ४ सामने जिंकले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Wasim jaffer trolled umpire kumar dharmasena before england new zealand semifinal clash adn

ताज्या बातम्या