scorecardresearch

Babar Azam: ‘काहीतरी लाज बाळगा! हा कसला Mr. ३६०, साधा ६० डिग्री पण…’ सूर्याची नक्कल बाबर आझमला पडली महागात

Babar Azam Video Viral: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात त्याला मिस्टर ३६० डिग्री म्हटले होते. बाबरने नेट प्रॅक्टिस दरम्यान असा शॉट खेळला ज्यासाठी सूर्यकुमार यादव प्रसिद्ध आहे.

WATCH: Babar Azam was copying Suryakumar Yadav Kuch to Sharm karo yaar
सौजन्य- (ट्विटर)

Pakistan Captain Babar Azam Video Viral: भारताचा सुपरस्टार फलंदाज सूर्यकुमार यादव मैदानावर उभा राहतो तेव्हा चाहत्यांना मोठे फटके पाहायला मिळतील अशी अपेक्षा असते. इतर क्रिकेटपटूही त्याच्या शॉटची कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनेही असेच काहीसे केले पण त्याचा त्याच्यावर उलटसुलट परिणाम झाला. सूर्याच्या चाहत्यांनी त्याला ट्रोल केले.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम मिस्टर ३६० बनण्याच्या मार्गावर आहे. यापूर्वी बाबरचा एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये तो महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सप्रमाणे चारही दिशांनी नेटमध्ये शॉट्सचा सराव करताना दिसत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला, यादरम्यान एकीकडे काही चाहत्यांनी पाकिस्तानी कर्णधाराचे कौतुक केले तर काही जण त्याला ट्रोल करताना दिसले. मात्र, आता मैदानावर बाबरने नसीम शाहला असा षटकार मारला की क्रिकेट चाहत्यांनी त्याला पाकिस्तानचा मिस्टर ३६० म्हणायला सुरुवात केली आहे.

बाबर आझमचा व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तो नेट-प्रॅक्टिसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फटके मारताना दिसतो. यादरम्यान बाबरने अशा शॉटचा सरावही केला, जो ‘मिस्टर ३६० डिग्री’ साठी प्रसिद्ध असलेल्या सूर्यकुमार यादवने अनेकदा वापरला आहे. यामुळे काही चाहत्यांनी त्याचे कौतुकही केले, मात्र सूर्यकुमारच्या चाहत्यांनी बाबरला ट्रोल करायला वेळ लावला नाही.

बाबरला ‘न्यू मिस्टर ३६०’ सांगितले

क्रिकेट पाकिस्तानने बाबर आझमचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये बाबरचे वर्णन न्यू मिस्टर ३६० असे करण्यात आले आहे. वास्तविक, सूर्यकुमारला ‘मिस्टर ३६० डिग्री’ असेही म्हणतात. याचे कारण म्हणजे तो मैदानात सर्वत्र फटके मारू शकतो. सूर्याच्या नावावर टी२० फॉरमॅटमध्ये तीन आंतरराष्ट्रीय शतके आहेत.

हेही वाचा: Ravindra Jadeja: “पुन्हा जर्सी परिधान करणे…” ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी रवींद्र जडेजा झाला भावनिक, तब्बल पाच महिन्यांनंतर पुनरागमन

चाहत्यांनी घेतला जोरदार समाचार

सूर्यकुमार यादवच्या चाहत्यांनीही या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले “जरा लाज वाटू दे.”. त्याच वेळी, दुसऱ्या चाहत्याने व्हिडिओवर टिप्पणी केली. दीपक नावाच्या युजरने लिहिले फक्त एक मिस्टर ३६० डिग्री आहे आणि तो म्हणजे सूर्यकुमार यादव बाकी सगळे निव्वळ फेक आहेत.” एकाने तर असे लिहिले की डायरेक्ट बाप काढला. त्यामुळे बाबर सोशल मीडियावर खूप ट्रोल झाला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 11:59 IST