MI-W vs UPW-W, WPL 2023 Eliminator Match updates : नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये महिला प्रीमियरल लीगचा रंगतदार सामना होत आहे. मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात एलिमिनेटर सामन्याचा महामुकाबला रंगला. मुंबईने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ४ विकेट्स गमावत १८२ धावा केल्या. त्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या यूपी वॉरियर्सच्या फलंदाजांची मुंबईच्या गोलंदाजांनी पुरती दमछाक केली. मुंबईच्या इस्सी वोंगने भेदक मारा करून वुमन्स प्रीमियर लीगमधील पहिली विकेट हॅट्रिक घेतली. दरम्यान, मुंबईने १७.४ षटकांत यूपी वॉरियर्सचा आख्खा संघ ११० धावांवर गारद केला आणि या सामन्यात विजय मिळवून लीगच्या फायनलमध्ये प्रवेश केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इस्सीने धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या किरण नवगिरेला ४३ धावांवर झेलबाद केलं. त्यानंतर सोफी एक्लेस्टोन आणि सिमरन शेखची दांडी गुल करत इस्सीने डब्ल्यूपीएलच्या इतिहासात पहिल्या विकेट हॅट्रिकची नोंद केली. इस्सी वोंगचा विकेट हॅट्रिकचा व्हिडीओ महिला प्रीमियर लीगच्या ट्वीटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे.

इथे पाहा व्हिडीओ

दरम्यान, मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरला आक्रमक खेळी करून मोठी धावसंख्या साकारता आली नाही. सोफी एक्लस्टोनच्या फिरकीवर कौर १४ धावांवर असताना त्रिफळाचीत झाली. सौफीने कौरची दांडी गुल केल्याचा व्हिडीओ ट्वीटरवर तुफान व्हायरल झाला आहे. दरम्यान, सिवर ब्रंटने आणि केरने धडाकेबाज फलंदाजी करून यूपीच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. सिवरने ३८ चेंडूत ७२ धावा कुटल्या. तर केरने १९ चेंडूत २९ धावा केल्या. या धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने २० षटकांत ४ विकेट्स गमावत १८२ धावांपर्यंत मजल मारली होती.

मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्समध्ये पॉवर प्ले मध्ये रंगतदार सामना सुरु असतानाच दिप्ती शर्माच्या गोलंदाजीवर सामन्याला वेगळं वळण लागलं. कारण मुंबईची सलामीवीर फलंदाज हेली मॅथ्यूजने मोठा फटका मारून हवेत चेंडू मारला होता. त्याचदरम्यान अंजली सरवानीने जबरदस्त झेल घेतला. पण रिप्लाय पाहिल्यानंतर अंजलीचे बोट जमिनीला टेकलेले दिसले आणि मॅथ्यूजला जीवदान मिळाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch issy wong takes first wicket hat trick in wpl 2023 mumbai indians women wins against up warriors women nss
First published on: 24-03-2023 at 22:54 IST