Rahul Dravid on Team India’s Preparations: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. ऑस्ट्रेलियन संघ बंगळुरूमध्ये या महत्त्वाच्या मालिकेसाठी तयारी करत असतानाच भारतीय संघाने नागपुरातच सराव शिबिर उभारले आहे. येथे विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडिया येथे जोरदार सराव करत आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने एका व्हिडिओ पोस्टमध्ये सांगितले आहे की टीम इंडियाची तयारी कशी सुरू आहे आणि कोणत्या गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे.

बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय संघाचा संपूर्ण कसोटी संघ फलंदाजी आणि गोलंदाजीपासून क्षेत्ररक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात घाम गाळत आहे. या व्हिडिओमध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीपासून ते रवींद्र जडेजापर्यंत नेटवर सराव करताना दिसत आहेत. संघाचे प्रशिक्षक कर्मचारीही खेळाडूंच्या तयारीची तपासणी करताना दिसत आहेत.

chennai super kings vs kolkata knight riders match preview
IPL 2024 : विजयी पुनरागमनासाठी चेन्नई सुपर किंग्ज उत्सुक! आज अपराजित कोलकाताचे आव्हान; कर्णधारांच्या कामगिरीकडे लक्ष 
India Vs Pakistan bilateral series
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका होणार? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजनासाठी व्यक्त केली इच्छा
IPL 2024 Lucknow Super Giants vs Rajasthan Royals match sport news
तंदुरुस्त राहुलवरच लखनऊची भिस्त; ‘आयपीएल’मध्ये आज सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सशी सामना
Virat Kohli and Rachin Ravindra Video Viral
CSK vs RCB : सामन्यादरम्यान कोहलीने पुन्हा उत्साहात गमावले भान, रचिन बाद झाल्यावर अशी दिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO

या व्हिडीओमध्ये राहुल द्रविड म्हणतोय, “गेले दोन-तीन दिवस खूप छान गेले. आम्ही काही लांब सराव सत्रे केली. कोचिंग स्टाफ म्हणून, हे खूप रोमांचक होते कारण सामान्यतः बॅक टू बॅक सामन्यांमुळे खेळाडूंसोबत इतका वेळ घालवण्याची संधी फारच कमी असते. गेल्या महिनाभरापासून या मालिकेसाठी रणनीती आखली जात होती, आता हे ५-६ दिवस खूप महत्त्वाचे आहेत.”

‘क्लोजिंग कॅच आणि स्लिप फिल्डिंगवर अधिक लक्ष’

राहुल द्रविड म्हणतो, “प्रत्येकजण चांगल्या लयीत असल्याचे दिसते. संपूर्ण कसोटी संघाला एकत्र पाहणे चांगले आहे. गेल्या महिन्यात आम्ही टी२० आणि एकदिवसीय भरपूर क्रिकेट खेळलो, त्यामुळे कसोटी मालिकेपूर्वी हे शिबिर आवश्यक होते. काही खेळाडू मर्यादित षटकांच्या क्रिकेट वरून कसोटी क्रिकेटकडे वळणार आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठीही हे प्रशिक्षण शिबिर फायदेशीर ठरणार आहे. त्याला नेट प्रॅक्टिससाठी आणखी थोडा वेळ दिला जात आहे. आमची क्षेत्ररक्षणाची बाजू भक्कम दिसत आहे. क्लोजिंग कॅचिंग आणि स्लिप फिल्डिंगवर अधिक भर दिला जात असून हा घटक देखील खूप महत्वाचा आहे.”

हेही वाचा: IND vs AUS: कांगारूंना आपल्या तालावर नाचवण्याआधी टीम इंडियाच्या धुरंधरांनी केला जबरदस्त डान्स, पाहा Video

प्रशिक्षक द्रविड म्हणतो, “सततच्या क्रिकेटमुळे, संघ सहसा कोणत्याही मालिकेसाठी एक किंवा दोन दिवस आधीच एकत्र येतो. त्यामुळे अशा परिस्थितीत संघावर काम करण्यासाठी तुमच्याकडे फारसा वेळ नसतो. मला अधिक वेळ चालणारे प्रशिक्षण शिबिरे आवडतात कारण यातूनच खेळाडू आणि संघावर योग्य काम करता येते. नागपुरात आम्हाला ५ ते ६ दिवसांचा वेळ मिळाला याचा मला खूप आनंद आहे, आशा आहे की यातून चांगले परिणाम निघतील.”