Mohammad Siraj taking six wickets against Sri Lanka Watch Video: भारत आणि श्रीलंकेचे संघ अंतिम फेरीत आमनेसामने आहेत. विजेतेपदाच्या लढतीत श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर केवळ ५० धावांचे माफक आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने ६.२ षटकात १०विकेट्स राखून सामना जिंकला.आजच्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने चुकीचा ठरवला. त्याने शानदा गोलंदाजी करताना ६ विकेट्स घेत श्रीलंकेच्या डावाला सुरुंग लावला.

आशियातील सर्वात मोठ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मात्र एकतर्फी लढत पाहायला मिळाली. मोहम्मद सिराज याने घेतलेल्या ६ व हार्दिक पांड्या याने घेतलेल्या ३ विकेट्सच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेचा डाव १५.२ षटकांत केवळ ५० धावांवर संपुष्टात आणला. यामध्ये मोहम्मद सिराजने फक्त एका षटकांतच ४ विकेट्स घेत इतिहास रचला. त्याच्या या ६ विकेट्सचा व्हिडीओ पाहूया.

Phil Salt departs for 43 after suicidal run out by Shreyas Iyer
IND vs ENG: आधी ३२ मी. वायूवेगाने धावला अन् रॉकेट थ्रोसह अय्यरने केलं रनआऊट, सॉल्टला महागात पडली एक धाव; पाहा VIDEO
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
IND vs ENG Stampede scenes during 2nd ODI ticket sale in Cuttack few fans fall unconscious
IND vs ENG: भारत-इंग्लंड वनडे तिकिट विक्रीदरम्यान कटकमध्ये चेंगराचेंगरी, काही जण झाले बेशुद्ध; VIDEO व्हायरल
India vs England 5th T20 LIVE Score Updates in Marathi
IND vs ENG 5th T20I Highlights : अभिषेकच्या ऐतिहासिक शतकाच्या जोरावर भारताचा मोठा विजय! इंग्लंडचा १५० धावांनी केला दारुण पराभव
Ranji Trophy 2025 Mumbai defeated Meghalaya by an innings and 456 runs
Ranji Trophy 2025 : मुंबईचा मेघालयवर दणदणीत विजय; ८ विकेट्स आणि ८४ धावांसह शार्दूल ठाकूरचे महत्त्वपूर्ण योगदान
India vs England 4th T20 Highlights in Marathi
India vs England 4th T20I Highlights: हर्षित राणाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, सलग पाचव्या टी-२० मालिकेत इंग्लडला चारली धूळ
U19 Eng vs SA bizarre run out as Aaryan Sawant video viral
U19 ENG vs SA : धक्कादायक! विचित्र रनआऊटच्या नादात थोडक्यात वाचला फिल्डर, VIDEO होतोय व्हायरल
SL vs AUS Josh Inglis scores century on debut test match in front of parents breaks many records at Galle
SL vs AUS : जोश इग्लिसचे कसोटी पदार्पणात विक्रमी शतक! मोडले अनेक विक्रम

एका षटकात ४ विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज –

मोहम्मद सिराजने चौथ्या षटकात सहा चेंडूत चार बळी घेतले. प्रथम, त्याने चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पथुम निसांकाला रवींद्र जडेजाकडून झेलबाद केले. निसांकाला चार चेंडूत दोन धावा करता आल्या. यानंतर तिसऱ्या चेंडूवर सदिरा समरविक्रमाला एलबीडब्ल्यू आऊट केले. चौथ्या चेंडूवर त्याने चरित असलंकाला इशान किशनकरवी झेलबाद केले. मात्र, त्याची हॅटट्रिक हुकली. पाचवा चेंडू चौकारासाठी गेला. यानंतर अखेरच्या चेंडूवर सिराजने धनंजय डी सिल्वाला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले.

हेही वाचा – Asia Cup Final 2023 IND vs SL: यष्टीरक्षक केएल राहुलने पहिल्या स्लिपमध्ये जात घेतला जबरदस्त झेल, पाहा VIDEO

श्रीलंकेला सहाव्या षटकात १२ धावांवर सहावा धक्का बसला. सिराजने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आणि क्लीन बोल्ड कर्णधार दासुन शनाकाला तंबूत पाठवले. त्यानंतर मोहम्मद सिराजने कुसल मेंडिलाही क्लीन बोल्ड केले.

https://x.com/StarSportsIndia/status/1703371516359082424?s=20

१९ दिवस चाललेल्या या स्पर्धेत १३सामने खेळले गेले. भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेचा डाव ५० धावांवर आटोपला. भारताने ६.२ षटकात १०विकेट्स राखून सामना जिंकला.

Story img Loader