वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज निकोलस पूरन टी-१० लीगमध्ये आपले कौशल्य दाखवत आहे. खराब फॉर्मवर मात करत निकोलस पूरनची बॅट आता पुन्हा तळपली आहे. बुधवारी (३० नोव्हेंबर) अबू धाबी टी-१० लीगमध्ये, डेक्कन ग्लॅडिएटर्ससाठी फलंदाजी करणाऱ्या या कॅरेबियन फलंदाजाने बांगला टायगर्सविरुद्ध १६ चेंडूत ५० धावा केल्या. यादरम्यान शाकिब अल हसन त्याचा शिकार ठरला. त्याने कोणतीही दयामाया न दाखवता शाकिबच्या एका षटकात ५ षटकार मारून ३० धावा केल्या.

ग्लॅडिएटर्सच्या डावाच्या पाचव्या षटकात ही घटना घडली. शाकिब पहिले षटक टाकायला आला. पूरनने या षटकाची सुरुवात स्फोटक पद्धतीने केली. पूरनने पहिल्याच चेंडूवर जोरदार स्लॉग स्वीप शॉट मारत षटकार लगावला. त्याने अशाप्रकारे सुरुवात केली आणि मग थांबता थांबेना. पूरनने पुढच्या दोन चेंडूंवरही षटकार ठोकले. यानंतर षटकाचा चौथा चेंडू डॉट होता, पण शेवटच्या दोन चेंडूंवर शाकिबला कोणत्याही प्रकारे स्वत:ला सावरता आले नाही आणि पूरनने षटकात ५ षटकार मारून ३० धावा कुटल्या.

Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
CSK vs LSG : मार्कस स्टॉयनिसच्या शतकाच्या जोरावर लखनऊने चेन्नईचा ६ विकेट्सनी उडवला धुव्वा, ऋतुराजची खेळी ठरली व्यर्थ
IPL 2024 Travis Head Breaks Many Records with 89 Runs innings against Delhi Capitals
IPL 2024: ११ चौकार, ६ षटकार, २७८च्या स्ट्राईक रेटने ट्रॅव्हिस हेडने दिल्लीच्या गोलंदाजांना धू धू धुतलं! ८९ धावांच्या खेळीत अनेक विक्रम
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: लवकरच सगळेजण हार्दिक पंड्याचे गोडवे गातील; कायरॉन पोलार्ड हार्दिकच्या मागे भक्कम उभा
Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात

८ चेंडूत केल्या ४६ धावा –

या सामन्यात कर्णधार निकोलस पूरनने ३१२.५० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. ज्यामध्ये त्याने ७ षटकारांसह १ चौकार लगावला. म्हणजेच या सामन्यात पूरनने अवघ्या ८ चेंडूत ४६ धावा ठोकल्या. या कॅरेबियन फलंदाजाला यापूर्वी खराब फॉर्मचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्याने वेस्ट इंडिजचे कर्णधारपदही सोडले होते. आयपीएलमधील सनरायझर्सने त्याला आयपीएल मिनी लिलावापूर्वी रिलीज केले आहे. पण आता पूरनसाठी गोष्टी बदलत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा – Video: आई बाबा नव्हे मनात फक्त ‘ती’ व्यक्ती…ऋतुराज गायकवाडने सांगितलं ६ बॉलमध्ये ७ षटकार मारण्याचं गुपित

निकोलस पूरनने १६ चेंडूत ५० धावा केल्या, तर त्याचे सहकारी सलामीवीर देखील विरोधी गोलंदाजांची दमदार धुलाई करताना करताना दिसला. टॉम कोहलर-कॅडमोरनेही २१ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने २३८.०९ च्या स्ट्राईक रेटने ५० धावा केल्या. या दोन खेळाडूंच्या खेळीच्या जोरावर डेक्कन ग्लॅडिएटर्सने अवघ्या ३१ चेंडूत १०९ धावा करत सामना संपवला. त्याचबरोबर हा सामना ग्लॅडिएटर्सने १० गडी राखून जिंकला.